PBKS vs RCB : विराटचा एक थ्रो अन् त्या 92 धावा... जय पराजयात फरक फक्त एवढाच!

Virat Kohli
Virat Kohli Throw Shashank Singh Wicket PBKS vs RCB IPL 2024ESAKAL
Updated on

Virat Kohli Throw Shashank Singh Wicket PBKS vs RCB IPL 2024 : धमरशालाच्या स्टेडियमवर टॉस पंजाबनं जिंकला अन् भांगडा मात्र आरसीबीनं केला. विराट कोहलीनं पॉवर प्लेमध्ये नॉर्मलच बॅटिंग केली. त्यात पंजाबच्या फिल्डर्सनी विराटचे पाठोपाठ दोन कॅच सोडले. रजत पाटीदारला देखील जा सिमरन जा जी ले तरी जिंदगी असं म्हणत शुन्यावरच जीवनदान दिलं. पहिल्या 5 षटकातच एवढा राडा झाल्यावर विराट कोहली अन् रजत पाटीदारनं पंजाबच्या बॉलर्सची कुटून कुटून चटणी केली.

विराट कोहलीचं अर्धशतक तसं लो स्ट्राईक रेटचंच होतं. दुसरीकडं रजत मात्र चांगलाच तापला होता. त्यानं 21 चेंडूत अर्धशतक ठोकत पुन्हा एकदा आरसीबीसाठी बुस्टर डोसचं काम केलं. रजत बाद झाल्यावर विराटनं आपली गाडी टॉप गिअरमध्ये टाकली अन् ज्यांनी ज्यांनी स्ट्राईक रेटवरून गळा काढला होता. त्यांचा सर्वांचा आवाज बंद केला.

विराट हाणामारी करत होता जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटनं तो आयपीएलमधलं आपलं नववं शतक ठोकणार असं वाटत असतानाच त्याला 92 धावांवर अर्शदीप सिंगनं बाद केलं. विराट बाद झाल्यावर ग्रीननं 42 धावांची खेळी करत आरसीबीनं 241 धावांचा टप्पा गाठून दिला. स्लॉग ओव्हरमध्ये हर्षल पटेलने चांगला मारा केल्यामुळं आरसीबीला 250 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

Virat Kohli
Yuvraj Singh T20 WC 2024 : रोहितपेक्षा 'या' दिग्गजाच्या गळ्यात असावं वर्ल्डकपचं मेडल... युवराज सिंगनं कोणाचं नाव घेतलं?

विराटच्या या धडाकेबाज शो नंतर पंजाबनंही आपला दम दाखवला जॉनी बेअरस्टो अन् रिली रूसो यांनी पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. 6 ओव्हरमध्ये 75 रन्स करणारी पंजाब आरसीबीचं 241 धावांच टार्गेट एक दोन षटकं राखूनच पार करणार की काय असं वाटत होतं. रूसोनं तर 27 चेंडूत 61 धावा ठोकल्या होत्या.

बेअरस्टो बाद झाल्यावर शशांक सिंहने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला 14 व्या षटकातच 150 धावांची मजल मारून दिला. 19 बॉलमध्ये 37 रन्स करणारा शशांक सिंह पुन्हा एकदा पंजाबसाठी धमाका करण्यासाठी सज्ज असतानाच विराट कोहलीनं त्याला रन आऊट केलं.

संपूर्ण सामन्यात पंजाबची फिल्डिंग खूप खराब झाली होती. विराट कोहलीला दोन तर रजत पाटीदारला एक असे तीन जीवनदान पंजाबनं पहिल्या पाच ओव्हरमध्येच दिली होती. जरी पंजाब विराटवर मेहरबान असली तरी विराट मात्र पंजाबवर मेहरबान झाला नाही. त्यानं शशांकला डायरेक्ट थ्रो करत बाद केलं.

Virat Kohli
KL Rahul LSG Captaincy : केएल राहुल त्वरित सोडणार लखनौची कॅप्टन्सी? LSG मध्ये जोरदार हालचाली

खरं तर दोन्ही संघांकडून पॉवर हिटिंग झाली अन् त्याला कंट्रोल करणारी बॉलिंग देखील झाली. मात्र सामन्याचं खरं चित्र हे या थ्रो नंतर पालटलं. शशांक बाद झाला अन् पंजाबच्या चेस नजर लागली. त्यांची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मोहम्मद सिराज अन् लॉकी फर्ग्युसननं पंजाबची अवस्था 3 षटकात 5 बाद 151 धावांवरून सर्वाबाद 181 धावा अशी करून टाकली.

आरसीबीच्या फिरकीनं आधी टॉप ऑर्डर उडवली होती. त्यानंतर आरसीबीच्या तोफखान्यानं पंजाबची शेपटी गुंडाळली. सामन्याचा मानकरी हा विराटच होता. मात्र त्यानं 47 चेंडूत केलेल्या 92 धावा करत सामना फिरवला नाही तर शशांक सिंहला रन आऊट करणार विराटचा थ्रो सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.