Rishabh Pant : बाबा जरा जबाबदारीनं खेळ; सेहवागचा पंतला सल्ला

Virender Sehwag Advice Rishabh Pant
Virender Sehwag Advice Rishabh Pant ESAKAL
Updated on

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एक सल्ला दिला आहे. विरेंद्र सेहवाग हा भारताचा धडाकेबाज सलामीवीर होता. तो कोणतही भीड न बाळगता आक्रमक शैलीतच फलंदाजी करणे पसंत करत होता. त्याने ऋषभ पंतला मात्र जबाबदारीने खेळ (Play Responsibly) करण्याचा सल्ला दिला. तो म्हणतो की ऋषभ पंतने जबाबदारीने खेळणे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करणे यात योग्य समतोल साधणे गरजचे आहे.

Virender Sehwag Advice Rishabh Pant
ऑलिम्पिक फायनलिस्ट थाळीफेकपटू कमलप्रीत कौर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएल हंगामात 9 सामन्यात 149.04 च्या सरासरीने 234 धावा केल्या आहेत. मात्र त्याला यंदाच्या हंगामात एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. तो तीन वेळा चाळीशीमध्ये बाद झाला आहे. आज दिल्ली सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध भिडत आहे. हा सामना दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या अनुशंगानेच विरेंद्र सेहवागने पंतला सल्ला दिला.

सेहवाग म्हणाला, 'ऋषभ पंतने आता जरा जबाबदारीने खेळ केला पाहिजे. मात्र त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे फलंदाजी करता त्यावेळी तुमचा स्ट्राईक रेट खाली येतो. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी तो मुक्तपणे खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो बाद होत आहे. त्याला आता मुक्तपणे खेळत शेवटपर्यंत टिकण्यासाठी योग्य समतोल राखता आला पाहिजे. पंतने दडपणाखाली न खेळता त्याच्या त्याच्या स्टाईलनेच बॅटिंग करावी. 40 चेंडूत 40 धावा हे पंतला सूट होत नाही.'

Virender Sehwag Advice Rishabh Pant
खराब संघरचनेमुळे मुंबईची ही अवस्था : जयवर्धने

लखनौ सुपर जायंटविरूद्धच्या सामन्यात पंतने 30 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. मात्र दिल्ली हा सामना 6 धावांनी गमावला होता. लखनौच्या 196 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला 189 धावांपर्यंच मजल मारता आली होती. केएल राहुलने त्या सामन्यात 77 धावांची खेळी केली होती. या जोरावारच लखनौने 195 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 9 सामन्यात फक्त 4 विजय मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत आठ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दिल्ली आज सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध सामना खेळत आहे. याही सामन्यात ऋषभ पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 16 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.