सेहवाग म्हणतो; हसण्यावारी घेऊ नका! चहल तू फक्त नाव सांग

चहलने सांगितले की 2013 मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग असताना त्याने मृत्यूला जवळून पाहिले
Virender Sehwag reaction after Yuzvendra Chahal revealed bullied in 2013 Mumbai Indians
Virender Sehwag reaction after Yuzvendra Chahal revealed bullied in 2013 Mumbai Indians
Updated on

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. चहलने सांगितले की 2013 मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग असताना त्याने मृत्यूला जवळून पाहिले. एका मद्यधुंद खेळाडूने हॉटेलच्या १५व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून आपल्याला उलट लटकवल्याचा खुलासा चहलने केला आहे. या वक्तव्यानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चहलला त्या खेळाडूचे नाव विचारले.

वीरेंद्र सेहवागने 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील एक छायाचित्र शेअर करत लिहिले की, युजवेंद्र चहलच्या म्हणण्यानुसार, नशेच्या अवस्थेत त्याच्यासोबत हे कृत्य करणाऱ्या खेळाडूचे नाव उघड करणे आवश्यक आहे. जर हे खरे असेल तर त्याच्याकडे विनोद म्हणून पाहू नका. काय झाले आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काय कारवाई करता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

रविचंद्रन अश्विनसोबतच्या संभाषणात भूतकाळाची आठवण करून देत चहलने पहिल्यांदाच याचा खुलासा केला आहे. त्याच्या सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीने त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करुण नायर देखील आहे. व्हिडिओमध्ये चहल म्हणाला काही लोकांना माझी कथा माहित नाही, मी ती कधीही सांगितली नाही.

युझवेंद्र चहल म्हणाला, २०१३ ची गोष्ट आहे, तेव्हा मी मुंबई इंडियन्सच्या संघात होतो. आमची मॅच बंगळुरूमध्ये होती, त्यानंतर गेट-टूगेदर केलं. तिथे एक खेळाडू होता, मी त्याचे नाव घेणार नाही जो खूप मद्यधुंद होता. त्याने मला आवाज दिला तो बराच वेळ माझ्याकडे पाहत होता. तेव्हा मी त्याच्याकडे गेलो, त्याने मला बाल्कनीत नेले आणि खाली उलट लटकवले.तिथे बरेच लोक होते आणि त्यांनी तिथे पोहोचून मला सोडवले, गोष्टी नीट केल्या, मला नॉर्मल करण्यासाठी पाणी देण्यात आले. मी मृत्यूच्या अगदी जवळ आलेली ही घटना होती. थोडीशीही चूक झाली असती तर मी पडलो असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.