Virender Sehwag : आम्ही श्रीमंत लोकं गरीब देशात जात नाही... सेहवाग गिलख्रिस्टला असं का म्हणाला?

Virender Sehwag
Virender Sehwag Adam Gilchrist On Big Bashesakal
Updated on

Virender Sehwag Adam Gilchrist On Big Bash : विरेंद्र सेहवाग हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसोबतच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. सेहवाग काहीतरी बोललाय अन् त्याची बातमी झालेली नाही असं कधी होत नाही. आताही विरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्टला दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.

अर्थात विरेंद्र सेहवागने गिलख्रिस्टला विनोदाचा भाग म्हणून उद्दाम उत्तर दिलं आहे. विरेंद्र सेहवाग आणि अॅडम गिलख्रिस्ट हे एका पॉडकास्टमध्ये बोलत होते. त्यावेळी गिलख्रिस्टने येत्या काळात भारतीय खेळाडू दुसऱ्या टी 20 लीगमध्ये खेळताना दिसतील का असा प्रश्न सेहवागला विचारला.

Virender Sehwag
Ind vs Afg 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात ही असणार भारताची Playing 11, या खेळाडूंना मिळणार संधी?

त्यावर विरेंद्र सेहवाग विनोदाने म्हणाले की, 'नाही आम्हाला गरज नाही. आम्ही श्रीमंत लोकं आहोत. आम्ही दुसऱ्या गरीब देशात लीग खेळण्यासाठी जात नाही.'

विरेंद्र सेहवागने त्याच्याबाबतचा बिग बॅश लीगमध्ये झालेला एक किस्सा देखील यावेळी सांगितला.

Virender Sehwag
CSK च्या पिवळ्या वादळात नाचणारा एकटा लखनौ फॅन! LSG च्या विजयानंतरचा व्हिडियो व्हायरल

तो म्हणाला की, 'मला अजूनही आठवतंय की ज्यावेळी मला भारतीय संघातून वगळण्यात आलं आणि मी आयपीएल खेळत होतो. त्यावेळी मला बिग बॅश लीगमधून ऑफर आली होती. मला बिग बॅशमध्ये खेळण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यावेळी मी त्यांना पैशाचं विचारलं. त्यांनी सांगितलं 1 लाख डॉलरची ऑफर दिली.'

मी म्हणालो की, एवढी रक्कम तर मी माझ्या सुट्टीवर खर्च करतो. गेल्या रात्रीचं बिल देखील याच्यापेक्षा जास्त झालं आहे.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.