पुणे: राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत हंगामातील आपला पहिला सामना जिंकला. राजस्थानने हैदराबाद समोर 211 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हैदराबादला 20 षटकात 7 बाद 149 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने 3 तर प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. हैदराबादकडून मारक्रमने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 40 धावा चोपून काढल्या. मात्र तोपर्यंत सामना हैदराबादच्या हातून गेला होता. (Washington Sundar blazing Inning can not stop Rajasthan Victory)
आयपीएल हंगामातील पुण्यातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने धडाकेबाज फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 210 धावा ठोकल्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने तुफानी खेळी करत 27 चेंडूत 55 धावा ठोकल्या. त्याला पडिक्कलने 41 तर जोस बटलरने 35 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये हेटमायरने हाणामारी करत 13 चेंडूत 32 धावा करत राजस्थानला 200 च्या पार पोहचवले.
हैदराबाद 210 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर त्यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र राजस्थान रॉयल्सच्या प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्डने नवीन चेंडूवर हैदराबादला हादरे दिले. प्रसिद्ध कृष्णाने कर्णधार केन विलयमसन आणि राहुल त्रिपाठीला बाद करत हैदराबादची अवस्था 2 बाद 7 धावा अशी केली. त्यानंतर ट्रेंट बोल्टने निकोलस पूरनला शुन्यावर बाद करत तिसरा आणि मोठा धक्का दिला. त्यानंतर चहलने अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादला चहलने चालता करत. हैदराबादची अवस्था 5 बाद 37 अशी केली. त्यानंतर मारक्ररमने अर्धशतक (57) पूर्ण करत झुंजार वृत्ती दाखवली. त्याच्या साथीला आलेल्या शेफर्डने 24 तर वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 40 धावा चोपल्या. मात्र या खेळीमुळे ते हैदराबादचा पराभव टाळू शकले नाहीत. अखेर हैदराबादचा डाव 20 षटकात 7 बाद 149 धावांवर संपला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.