Wasim Akram Javed Akhtar : पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम मनी बॅक गॅरेंटी या चित्रटाच्या माध्यमातून सिनसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. याबाबत बोलताना अक्रमने तो भारतीयांना किती मिस करतोय आणि या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काय काय दिव्यातून जावे लागले याबाबत बोलत होता. याचवेळी त्याने भारताचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये 26/11 च्या हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील आपली प्रतिक्रिया दिली.
वसिम अक्रमने हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या मुलखतीत म्हणाला, 'मी राजकीय विषयावर प्रतिक्रिया देत नाही. मी इथे माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलो आहे. जर मला एखाद्या दुसऱ्या देशात आमंत्रित केलं असेल तर मी सांगण्यासाठी काही सकारात्मक गोष्टी शोधतो.'
जावेद अख्तर पाकिस्तानात जाऊन म्हणाले होते की जर भारत 2008 ला झालेल्या हल्ल्याबाबत बोलू लागला तर पाकिस्तानने अपमानित झाल्याची भावना बाळगू नये. कारण 26 \ 11 च्या हल्ल्याचा मास्टर माईड पाकिस्तानात उघडपणे बाहेर फिरतोय. अख्तर यांनी भारताने नेहमी नुसरत फतेह अली खान आणि मेहंदी हसन यांचे खुल्या दिलाने स्वागत केले. मात्र पाकिस्तानने कधी भारतीची गाणकोकिळा कैलासवासी लता मंगेशकर यांना आंमत्रित केले नाही.
अक्रमला भारतात मिळणाऱ्या फॅन फॉलोईंग बद्दल विचारणा झाली त्यावेळी तो म्हणाला की, 'आम्हाला भारतात येणे खूप आवडते. मी वर्षाचे 7 ते 8 महिने तेथे असायचो. मी माझ्या मित्रांना मिस करोतय, तेथील लोक जेवण सर्वात महत्वाचं म्हणजे डोसा. आम्हाला डोसा पाकिस्तानात मिळत नाही. आम्ही लवकरच तेथे असू. मी मिस करत असलेली सर्व ठिकाणे विशेष करून मुंबईची घाई गडबड पाहणार आहे.'
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.