भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने (Wasim Jaffer) आयपीएल 2022 च्या लिलावाआधीच (IPL 2022 Mega Auction) बॉम्ब टाकला. जाफरने पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाच्या बॅटिंग कोच पदाचा राजीनामा दिला. त्याने हा राजीनामा आपल्या हटके स्टाईलने दिला. जाफरने ट्विट करून आपण पद सोडत असल्याचे सांगितले. (Wasim Jaffer Resign from Punjab Kings Batting Coach in unique way)
वासिम जाफर पंजाब किंग्जबरोबर 2019 मध्ये जोडला गेला होता. तो पंजाब किंग्जच्या सपोर्ट स्टाफबरोबर 2021 पर्यंत होता. त्याने ट्विट केले की, 'गुडबाय आणि आभार पंजाब किंग्ज तुमच्यासोबत काम करताना मजा आली. अनिल कुंबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आयपीएल 2022 साठी शुभेच्छा.' जाफरने या ट्विट सोबत ए दिल हे मुश्किल चित्रपटातील चन्ना मेरेया या गाण्याचे बोल असलेला फोटो देखील शेअर केला आहे.
गेल्या वर्षी वासिम जाफरला ओडिसा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. जाफरने भारताकडून 31 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1944 धावा केल्या आहेत. त्याने 212 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे.
केएल राहुलने देखील यापूर्वीच पंजाब किंग्जची साथ सोडली आहे. तो आता लखनौ सुपरजायंटचा कर्णधार आहे. याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी देखील पंजाब किंग्जबरोबरचा करार संपवला आहे. पंजाबने यंदाच्या हंगामात फक्त दोन खेळाडूच रिटेन केले आहेत. त्यांना मयांक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग या दोघांनाच रिटेन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.