मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) सुपर संडे मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झाला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्ली कॅपिटल्सने तुफान फटकेबाजी करत 215 धावा चोपन काढल्या. हे महाकाय आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरच्या आडवा आला तो त्यांचा जुना फिरकीपटू कुलदीप यादव. (Kuldeep Yadav) त्याने आपल्या जुन्या फ्रेंचायजीला चांगलाच दणका दिला. याचाच आधार घेऊन वासिम जाफरने एक मीम शेअर करून केकेआरला चिमटा काढला.
दिल्लीच्या 215 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. त्याचे अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर हे दोन सलामीवीर 38 धावात माघारी गेले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी डाव सावरत भागीदारी रचली. या दोघांनी 11 व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लागले. त्यानंतर ललित यावदने ही जोडी फोडली. त्याने नितीश राणाला 30 धावांवर बाद केले. यानंतर कुलदीप यादवने केकेआरला मोठा धक्का दिला. 33 चेंडूत 54 धावांची खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कुलदीपने 15 व्या षटकात कमालच केली. त्याने केकेआरचा गेल्या सामन्यातील हिरो पॅट कमिन्स, सुनिल नारायण आणि उमेश यादव यांना एकाच षटकात बाद केले.
कुलदीप यादव गेल्या हंगामात केकेआरकडून बेंचवरच बसून होता. भारतीय संघात देखील त्याला स्थान मिळत नव्हते. दरम्यान, त्याची कारकिर्द संपली अशी धारणा अनेकांची झाली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कुलदीप यादव जबरदस्त गोलंदाजी करत आहे. त्याने श्रीलंका दौऱ्यावर चांगला मारा करून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तसेच तो आयपीएलमध्येही भन्नाट मारा करत आहे. मध्यंतरी भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने कुलदीप यादवला केकेआरच्या मॅनेजमेंटने पूर्ण सिजन न खेळवून त्याला घरी बसवण्याची तयारीच केली होती अशी टीका केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.