Gujarat Titans vs Lucknow Super Giants IPL: लखनऊ सुपरजाएंट्स विरुद्धच्या लढतीत गुजरात टायटन्स संघाने कमालीची कामगिरी करुन दाखवली. मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) आपल्या भेदक माऱ्यानं पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्टार बॅटर केएल राहुल (KL Rahul) याला तंबूत धाडले. त्यानंतर शुबमन गिलने (Shubman Gill) स्पर्धेतील जबरदस्त कॅचचा नजराणा पेश केला. त्याने घेतलेला झेल पाहून क्रिकेट चाहतेच नव्हे तर समालोचन करणारेही आवाक झाले.
शुबमन गिलने एविन लुईस (Evin Lewis) चा झेल टिपला. लखनऊच्या डावातील चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लुईसने वरुण अरोन शॉर्ट लेंथ चेंडूवर पुल शॉट खेळला. हवेत स्केअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू झेलमध्ये रुपांतरित होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण गिलने मिड विकेटच्या दिशेने उलट्या दिशेनं पळत अफलातून झेल टिपला. हा कॅच बघून अनेक क्रिकेट चाहत्यांना 1983 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी घेतलेल्या कॅचची आठवण आली.
वर्ल्ड कप 83 च्या फायनलमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात कपिल पाजींनी सेम टू सेम असाच कॅच घेतला होता. ज्या कॅचनं मॅच भारताच्या बाजूनं फिरवली होती. भारतीय संघाने त्याकाळच्या तगड्या वेस्ट इंडीजला नमवून पहिला वहिला वर्ल्ड कपही जिंकला होता. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात यंदाच्या हंगामात गुजरातचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गिलने त्याच अंदाजात लुईसचा कॅच पकडला.
सोशल मीडियावर या झेलची जोरदार चर्चा सुरु आहे. क्षेत्ररक्षणाच सर्वोत्तम दर्जा दाखवणाऱ्या शुबमन गिलला फलंदाजीत मात्र नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. तो अवघ्या तीन चेंडूचा सामना करुन खातेही न उघडता तंबूत परतला. त्याला मोठी खेळी करता आली नसली तरी गुजरातने लखनऊ विरुद्धचा सामना जिंकत स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.