West Indies vs South Africa, 1st T20I: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी20 मालिका या दोन संघात सुरू आहे. दरम्यान, ही मालिका दोन्ही संघांचे नियमित टी20 कर्णधारांच्या अनुपस्थितीत सुरू आहे.
अशात यजमान वेस्ट इंडिजने जमैकाला झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 28 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ही मालिका आगामी टी20 वर्ल्ड कपच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. मात्र, सध्या दोन्ही संघांचे कर्णधार आयपीएलमध्ये असल्याने या मालिकांसाठी उपलब्ध नाहीत.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम आणि यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे, तर वेस्ट इंडिज संघातील कर्णधार रोवमन पॉवेल आणि शिमरॉन हेटमायर राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.
राजस्थान आणि दोन्ही संघ आयपीएलच्या प्लेऑफपर्यंत पोहचले असल्याने मार्करम, क्लासेन पॉवेल, हेटमायर मालिकेसाठी उपलब्ध राहू शकलेले नाहीत. मात्र अन्य खेळाडू आपापल्या संघाशी जोडले गेले आहेत. दरम्यान, चालू टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे प्रभारी कर्णधारपद रस्सी वॅन डर द्युसेन आणि वेस्ट इंडिजचे नेतृत्व ब्रेंडन किंग करत आहे.
पहिल्या टी20 सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजकडून प्रभारी कर्णधार ब्रेंडन किंगने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून केवळ काईल मायर्स (34) आणि रोस्टन चेस(32) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.
दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन आणि अँडिल फेहलुकवायो यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच गेराल्ड कोएत्झीने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 19.5 षटकात 147 धावांवरच सर्वबाद झाला.
दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेड्रिक्सने 51 चेंडूत 87 धावांची खेळी करत चांगली झुंज दिली होती. परंतु, त्याला अन्य कोणाकडून फारशी साथ मिळाली नाही. त्याच्याव्यतिरिक्त केवळ मॅथ्यू ब्रित्झके (19) आणि रस्सी वॅन डर द्युसेन (17) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.
वेस्ट इंडिजकडून मॅथ्यू फोर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर ओबेड मॅकॉयने 2 विकेट्स घेतल्या. तसेच रोस्टन चेस, शामर जोसेफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.