IPL 2024 : तब्बल 71.5 कोटी! MI vs CSK की CSK vs GT... यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाहिलेली मॅच कोणती?

Mi VS CKS
IPL 2024 most watched match Of IPL 2024esakal
Updated on

Which is the most watched match Of IPL 2024 : आयपीएलच्या कोणत्याही हंगामात सर्वात महत्वाचा सामना कोणता असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे सहाजिकच मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज असं येतं. मात्र यांदाच्या हंगामात काही असे सामने होते ज्यांच्याबद्दल फार चर्चा झाली. यात रोहित अन् हार्दिक प्रकरणामुळं मुंबई विरूद्ध गुजरात सामन्याचा समावेश होता. गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादामुळं आरसीबी विरूद्ध केकेआर सामन्याकडेही सर्वांचे लक्ष होतं.

Mi VS CKS
IPL 2024: सेम टू सेम! क्लासेन-हेडने जशी प्रॅक्टिस केली, तसेच शॉट्स RCB विरुद्ध मारले; Video एकदा पाहाच

मात्र आयपीएलची आन बान आणि शान असलेला सामना मुंबई विरूद्ध सीएसकेच राहिला आहे. त्याला आयपीएल 2024 देखील अपवाद ठरला नाही. 14 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर झालेला मुंबई विरूद्ध चेन्नई या सामन्याला जिओ सिनेमावर 71.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. असं जिओच्या अधिकृत वेबसाईटवरवरून सांगण्यात आलं आहे.

Mi VS CKS
RCB साठी लढलेल्या दिनेश कार्तिकचं प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात कौतुक, चिन्नास्वामी मैदानातील Video Viral

आयपीएल 2024 मधील सर्वाधिक पाहिलेला सामना

मुंबई विरूद्ध चेन्नई या सामन्याचे वॉच टाईम हे जवळपास 933 कोटी मिनिट इतके होते. त्याचे व्ह्यूवर्स हे 13 कोटीच्या आसपास होतात. आयपीएल 2023 ची चेन्नई विरूद्ध गुजरात टायटन्स फायनलवेळी असलेल्या व्ह्यूवर्सपेक्षाही हे आकडे मोठे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 हंगामाची सुरूवातच 59 कोटी व्ह्यूजने झाली होती. 22 मार्चला झालेल्या चेन्नई विरूद्ध आरसीबी सामन्यावेळी 660 कोटी मिनिट्स वॉच टाईम राहिला.

आयपीएल 2024 चे एकूण व्ह्यूज किती?

आतापर्यंत खेळलेल्या 29 सामन्यांच्या डाटावारून जवळपास 1200 कोरीट व्ह्यूज मिळाले आहेत. या 29 सामन्यांनी मिळून 14,800 कोटी मिनिट्स वॉच टाईम जनरेट केला आहे. तर 38.3 कोटी व्ह्यूवर्स मिळाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा आयपीएलच्या व्ह्यूवरशिपमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.