IPL Most Sixes : ६,६,६,६,... धोनी, रोहित, विराट नाही... तर 'या' खेळाडूने ठोकले IPL मध्ये सर्वाधिक गगनचुंबी षटकार

Who Hits Most Sixes In IPL History : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे.
Who Hits Most Sixes In IPL History
Who Hits Most Sixes In IPL Historysakal
Updated on

Who Hits Most Sixes In IPL History : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी 10 संघांमध्ये चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे.

यंदाच्या हंगामात कोण विजेता होईल, याबाबत आधीच काहीही सांगणे जरा कठीण आहे. तरी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा बॉल आणि बॅटमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंका नाही. मैदानावर चौकार आणि षटकार मारताना पाऊस पडताना दिसेल.

आयपीएलच्या या हंगामात संघांकडे एकापेक्षा एक असे फलंदाज आहेत जे गगनचुंबी षटकार मारण्यात पटाईत आहे. त्यामुळे यावेळीही षटकारांचा पाऊस पाहिला मिळू शकतो. त्याआधी आयपीएलच्या या सगळ्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर तो विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

Who Hits Most Sixes In IPL History
Ranji Trophy 2024 Rohit Sharma : मुंबईचा योद्धा... मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकताच रोहितची खास पोस्ट

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 357 षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने 243 सामन्यात 257 षटकार मारले आहेत. रोहितने 554 चौकारही मारले आहेत. गेल आणि रोहितमध्ये खूप अंतर आहे. गेलने 405 चौकारही मारले आहेत. या यादीत एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 184 सामन्यात 251 षटकार मारले आहेत. तर धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. धोनीने 250 सामन्यांमध्ये 239 षटकार मारले आहेत.

Who Hits Most Sixes In IPL History
Ranji Trophy : अखेर 8 वर्षांचा दुष्काळ संपला! मुंबईने विदर्भाचा पराभव करून 42व्यांदा बनली रणजी चॅम्पियन

हंगामातील पहिल्या सामन्यात कोहलीचा संघ धोनीच्या संघाशी भिडणार

आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होत आहे. त्याचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात धोनी आणि कोहली हे संघ भिडतील. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना 24 मार्च रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()