IPL 2024: अबब, तब्बल 155.8kph स्पीडचा बॉल! ज्याच्या वेगानं उडवली पंजाबची भंबेरी, तो कोण आहे मयंक यादव?

Who is Mayank Yadav?: आयपीएलमध्ये ताशी 155 किमीच्या वेगानं चेंडू टाकत लक्ष वेधलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या मयंक यादवची आत्तापर्यंतची कामगिरी कशी राहिली जाणून घ्या
 Mayank Yadav | IPL 2024
Mayank Yadav | IPL 2024Sakal
Updated on

Who is Mayank Yadav: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 11 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात लखौनौ सुपर जायंट्सने 21 धावांनी विजय मिळवला.

लखनौच्या या विजयात 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवचा मोलाचा वाटा राहिला. त्याने या सामन्यात 4 षटकांमध्ये 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. विशेष म्हणजे मयंकचा हा पहिलाच आयपीएल सामना होता.

दरम्यान, केवळ त्याची कामगिरीच या सामन्यातील चर्चेचा विषय ठरली नाही, तर त्याचा वेग हा सर्वाधिक चर्चेत राहिला. मयंकने सातत्याने ताशी 140 ते 150 किमी वेगाने गोलंदाजी केली.

त्याने या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही फेकला. त्याने पंजाबचा कर्णधार शिखर धवनविरुद्ध ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू फेकला. त्यामुळे तो सोशल मीडियावरही ट्रेंड होऊ लागला होता.

 Mayank Yadav | IPL 2024
IPL 2024 GT vs SRH : हैदराबाद संघाचे पारडे जड ; गत उपविजेत्या गुजरात संघाच्या गोलंदाजांचा कस

त्याने आधी जॉनी बेअरस्टोची विकेट घेत पंजाबची सलामी जोडी फोडली. बेअरस्टो 29 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे 10 षटकांपर्यंतच पंजाबने जवळपास 100 धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु नंतर मयंकने टाकलेल्या स्पेलमुळे पंजाबच्या हातून विजय निसटला.

त्याने बेअरस्टोनंतर 7 चेंडूत 19 धावा करणाऱ्या प्रभसिमरन सिंगलाही बाद केले, तसेच जितेश शर्माचा अडथळाही त्याने दूर केला. त्याच्या या विकेट्सनंतर 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 षटकात 5 बाद 178 धावाच करता आल्या.

दरम्यान, अनेकांना मयंक कोण आहे हे माहित नसेल. पण मयंकने यापूर्वीही देशांतर्गत क्रिकेट खेळताना अनेकदा लक्ष वेधले आहे. दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मयंकने 23 वर्षांखालील सीके नायुडू ट्रॉफी स्पर्धेत 6 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने छत्तीसगढविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. तसेच याच सामन्यात त्याने 66 धावा केल्या होत्या.

 Mayank Yadav | IPL 2024
Rohan Bopanna: मियामी ओपनमध्येही बोपण्णाचा डंका! 44 व्या वर्षी एब्डेनसह विजेतेपद जिंकत रचला नवा विक्रम

याशिवाय त्याने गेल्यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही किफायतशीर गोलंदाजी केली होती. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 4 सामन्यात 5 विकेट्स घेतलेल्या, तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या.

त्याचबरोबर देवधर ट्रॉफी 2024 स्पर्धेत नॉर्थ झोनकडून खेळताना 5 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात त्याचा इकोनॉमी रेट 6 पेक्षाही कमी होता.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मयंक यादवला लखनौ सुपर जायंट्सने 2022 च्या मेगा आयपीएल लिलावात 20 लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. परंतु, तो 2023 आयपीएलपूर्वी दुखापतग्रस्त झाला आणि संपूर्ण हंगामातून बाहेर झाला होता. परंतु, त्यानंतर त्याला 2024 मध्येही लखनौने कायम करत पदार्पणाची संधीही दिली.

मयंकने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 1 प्रथम श्रेणी सामना खेळला असून 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 17 लिस्ट ए सामने खेळताना 34 विकेट्स घेतल्या आहेत. 11 टी20 सामन्यांमध्ये त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()