Team India Opener Batter in T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील निम्म्याहून अधिक सामने खेळल्या गेले आहेत. या काळात अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने बीसीसीआयच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलनंतर टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप 2024 खेळायचा आहे, जो यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून सुरू होणार आहे.
त्यामुळे भारतीय संघाबाबत बरीच चर्चा होत असून कर्णधार रोहित शर्मासह सलामीला कोण येणार याबाबत काहीही ठरलेले नाही. आयपीएलचा हा हंगाम आणि त्याआधी खेळले गेलेले टी-20 सामने लक्ष्यात घेता चार खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये दावेदारी ठोकली आहे.
1. यशस्वी जैस्वाल
रोहित शर्माचा जोडीदार होण्यासाठी गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालचे नाव आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 17 टी-20 सामन्यांमध्ये 33 पेक्षा जास्त सरासरी आणि 161.93 च्या स्ट्राइक रेटने भारतासाठी सर्वात कमी फॉर्मेटमध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत. परंतु तो आयपीएल 2024 मध्ये त्याचा फॉर्म शोधत आहे.
जैस्वालने लीगच्या 17 व्या हंगामात आतापर्यंत 6 डावात 17 च्या सरासरीने केवळ 102 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत काही लोक टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, मात्र कर्णधार आणि निवडकर्त्यांचा विचार काय आहे हे पाहणे बाकी आहे.
2. विराट कोहली
अनुभवी फलंदाज विराट कोहलीही सलामीसाठी पर्याय ठरू शकतो. कोहलीला आयपीएलमध्ये डावाची सुरुवात करण्याचा जबरदस्त अनुभव आहे आणि तो 17 व्या मोसमातही तेच करत आहे. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत त्याने 72.20 च्या सरासरीने आणि 147.34 च्या स्ट्राइक रेटने 361 धावा केल्या आहेत. गेल्या टी-20 वर्ल्ड कपपासून कोहलीने भारतीय संघासाठी फक्त दोन टी-20 सामने खेळले आहेत परंतु त्याच्याकडे खूप अनुभव आहे, जो ICC टूर्नामेंटमध्ये खूप महत्त्वाचा आहे.
3. शुभमन गिल
आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला पण सलामीचा खूप अनुभव आहे. आणि त्याने भारतासाठी 14 टी-20 सामन्यांमध्ये 147.57 च्या स्ट्राइक रेट आणि 25.76 च्या सरासरीने 335 धावा केल्या आहेत. त्याच वेळी आयपीएलच्या चालू हंगामात त्याने 51 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 151.78 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने 255 धावा केल्या आहेत.
4. इशान किशन
डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन ज्याला बीसीसीआयने करार यादीतून काढून टाकले, तो टी-20 फॉरमॅटमध्ये घातक खेळाडू मानला जातो. अलीकडच्या काळात ईशानला भारतीय टी-20 संघात फारशी संधी मिळाली नाही, पण त्याने अनेक वेळा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत त्याने 6 डावात 30.66 च्या सरासरीने आणि 178.64 च्या स्ट्राइक रेटने 184 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत इशानकडे चांगला अनुभव आहे आणि तोही रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्ससाठी डावाची सुरुवात करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.