CSK IPL 2024 : थालाच्या किल्ल्याला 'या' हंगामात का लागला सुंरग? जाणून घ्या CSK प्ले-ऑफमध्ये न जाण्याची कारणे

Why CSK Not Qualify for Playoffs IPL 2024 : पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
CSK IPL 2024 : थालाच्या किल्ल्याला 'या' हंगामात का लागला सुंरग? जाणून घ्या CSK प्ले-ऑफमध्ये न जाण्याची कारणे
why csk not qualify for playoffs ipl 2024sakal
Updated on

Why CSK Not Qualify for Playoffs IPL 2024 : पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सीएसकेला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. आरसीबी आणि सीएसके या दोघांचेही प्रत्येकी 14 गुण होते, परंतु चांगल्या नेट-रन रेटमुळे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला.

CSK IPL 2024 : थालाच्या किल्ल्याला 'या' हंगामात का लागला सुंरग? जाणून घ्या CSK प्ले-ऑफमध्ये न जाण्याची कारणे
MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नईचे कर्णधारपद सोडले. आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. ऋतुराजने शानदार फलंदाजी करत 14 सामन्यात 583 धावा केल्या. कर्णधार म्हणून तो कुठे कमी पडला नाही. कारण चेन्नई प्लेऑफमध्ये न पोहोचण्याची काही मोठी कारणे होती...

वेगवान गोलंदाजांना दुखापत

या संपूर्ण हंगामात चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे आणि काही खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे त्रस्त झाले होते. मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंजताना दिसला आणि ती फक्त 6 सामने खेळू शकली. दुखापतीमुळे तो मध्येच श्रीलंकेला परतला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेमुळे 1 मे रोजी झालेल्या सामन्यानंतर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान मायदेशी परतला. तर वेगवान गोलंदाज दीपक चहर या हंगामातही दुखापतीशी झुंजताना दिसला आणि तो फक्त आठ सामने खेळू शकला. अशा स्थितीत सीएसकेची वेगवान गोलंदाजी खूपच कमकुवत झाली.

CSK IPL 2024 : थालाच्या किल्ल्याला 'या' हंगामात का लागला सुंरग? जाणून घ्या CSK प्ले-ऑफमध्ये न जाण्याची कारणे
Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

शिवम दुबेचा फॉर्म दुसऱ्या हाफमध्ये झाला खराब

मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबेचा फॉर्म शेवटच्या क्षणी खराब झाला. आयपीएल 2024 च्या पहिल्या 9 सामन्यांमध्ये शिवम दुबेने 350 धावा केल्या होत्या आणि त्याची सरासरी 58.33 होती. पण पुढच्या 5 सामन्यात शिवमच्या बॅटमधून फक्त 46 धावा आल्या. या काळात तो दोनदा शून्यावरही बाद झाला. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात शिवमने 15 चेंडूत फक्त 7 धावा केल्या.

रहाणेचा फ्लॉप शो

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रहाणेला मधल्या फळीत संधी देण्यात आली होती. मात्र रहाणेला छाप सोडता आली नाही. रहाणेने आयपीएल 2024 मध्ये 13 सामने खेळले, मात्र त्याला केवळ 242 धावा करता आल्या.

या काळात रहाणेची सरासरी 20.16 आणि स्ट्राइक रेट 123.46 होता. रहाणेच्या गेल्या वर्षीच्या आकड्यांशी याची तुलना केल्यास तो यावेळी आपला जुना फॉर्म विसरल्याचे स्पष्ट दिसत आहे. रहाणेने गेल्या वर्षी 14 सामन्यांत 326 धावा केल्या होत्या. या काळात त्याची सरासरी 32.60 आणि 172.49 होती.

CSK IPL 2024 : थालाच्या किल्ल्याला 'या' हंगामात का लागला सुंरग? जाणून घ्या CSK प्ले-ऑफमध्ये न जाण्याची कारणे
IPL 2024 Playoffs : प्लेऑफमध्ये कोणता संघ कधी अन् कोणाशी भिडणार? टाइम-तारखेसह जाणून घ्या सर्व अपडेट

रवींद्र-मिशेलची खराब कामगिरी

आयपीएल 2024 मध्ये न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी बॅटने निराशाजनक कामगिरी केली. रवींद्रने 10 सामन्यांत 22.20 च्या सरासरीने 222 धावा केल्या. रचिनला केवळ एका सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडता आला. डॅरिल मिशेलने 13 सामन्यात 28.90 च्या सरासरीने 318 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.