KKR vs LSG, IPL: लखनौने कोलकाताविरुद्ध मैदानात उतरताना का घातली मरून रंगाची जर्सी? कारण आहे खास

Lucknow Super Giants: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा संघ मरून रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता.
Lucknow Super Giants Jersey
Lucknow Super Giants JerseySakal
Updated on

Lucknow Super Giants Jersey: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 28 वा सामना रविवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सामना झाला. ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात लखनौचा संघ हिरव्या रंगाची छटा असलेली मरून रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता.

खरंतर लखनौची नियमित जर्सी गडद निळ्या रंगाची आहे. परंतु, रविवारी लखनौने मरून रंगाची जर्सी घातली होती. ही जर्सी लखनौने बंगालमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोहन बगानच्या सन्मानार्थ घातली होती.

Lucknow Super Giants Jersey
MI vs CSK, IPL 2024: 'एल क्लासिको'पूर्वी चेन्नई-मुंबईच्या खेळाडूंमध्ये वानखेडेवर दिसला 'दोस्ताना', पाहा Video

खरंतर मोहन बगान सुपर जायंट्स या क्लबची आणि लखनौ सुपर जायंट्स संघाची मालकी आरपी संजीव गोयंका ग्रुपकडे आहे.

मोहन बगानने 2023 मध्ये इंडियन सुपर लीगचे विजेतेपद जिंकल्यानंतर क्लब मालक गोयंका यांनी एटीके मोहन बगान हे नाव बदलून मोहन बगान सुपर जायंट्स असे नवीन नाव क्लबला दिले. त्यामुळे हे नवीन नाव 1 जून 2023 पासून वापरले जाते.

मोहन बगान हा बंगालमधीन प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत फुटबॉल क्लब आहे. या क्लबच्या सन्मानार्थ आयपीएल 2023 मध्येही लखनौने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कोलकातामध्ये खेळताना मरून रंगाची जर्सी परिधान केली होती.

Lucknow Super Giants Jersey
Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या बसचा हिटमॅन सारथी! चाहत्यांसमोरच स्विकारली नवी भूमिका, Video Viral

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे लखनौ संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

लखनौने 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या. लखनौकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलने 39 धावांची खेळी केली. कोलकाताकडून मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.