MS Dhoni Handover Captaincy : धोनी फिट होता तरी सीएसकेने कॅप्टन का बदलला... जाणून घ्या फक्त 3 पॉईंटमध्ये

MS Dhoni Handover Captaincy
MS Dhoni Handover Captaincyesakal
Updated on

MS Dhoni Handover Captaincy : चेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच एक मोठा धक्का दिला. महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवली आहे. चेन्नईने गेल्या वर्षी विजेतेपद पटकावलं होतं. आयपीएलच्या ट्विटर हँडलवरील एका पोस्टमुळे सर्वांना चेन्नईत नेतृत्व बदल झाल्याचे कळाले.

भारताकडून सहा वनडे आणि 19 टी20 सामने खेळलेला ऋतुराज 2020 मध्ये सीएसकेशी जोडला गेला. ऋतुराज हा चेन्नईकडून आतापर्यंत 52 सामने खेळला आहे. गेल्या वर्षी ऋतुराजने 16 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 590 धावा केल्या.

सीएसकेने आपल्या वेबसाईटवर एका वक्तव्यात सांगितले होते की, धोनीने चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 मध्ये नेतृत्व ऋतुराज गायकवाडच्या हातात सोपवले आहे. ऋतुराज 2019 पासून सीएसकेचा महत्वाचा भाग आहे. तो 52 सामने खेळले आहेत. धोनी या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. धोनी फिट असून देखील या हंगामात सीएसकेला कर्णधार का बदलावा लागला. तीन मुद्यात जाणून घेऊयात...

MS Dhoni Handover Captaincy
Ruturaj Gaikwad Captain IPL 2024 : गायकवाडला कर्णधार करणे CSK ची मोठी चूक? 2022 सारखंच होणार का...

धोनीचे वय आणि सीएसकेचे भविष्य

धोनी हा 42 वर्षाचा झाला आहे. तो फिट असला तरी आता सातत्याने विकेटकिपिंग करणे आणि कॅप्टन्सीचा अतिरिक्त दबाव झेलणे शक्य नाही. धोनी आपला आयपीएलचा शेवटचा टप्पा हा एक खेळाडू म्हणून एन्जॉय करू इच्छितो. धोनीला कॅप्टन्सी सोडायची होती हे सर्व जग जाणतं. त्यामुळे धोनीने संघाला त्याच्यासारखा विचार करणारा कर्णधार हवा असं हेरले होतं.

निवृत्तीपूर्वी कॅप्टन तयार करण्याची धोनीचीच इच्छा

ऋतुराज गायकवाड हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्रचे नेतृत्व करतो. ऋतुराजने एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. धोनी आता आयपीएलमध्ये ऋतुराजला तयार करू इच्छितो. ऋतुराज हा शांतीत क्रांती करणारा कर्णधार आहे. धोनीने रविंद्र जडेजाला संधी दिली होती. मात्र तो संधीचं सोनं करू शकला नाही. त्यामुळे ऋतुराजकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

MS Dhoni Handover Captaincy
MS Dhoni CSK : चेन्नईचा नेतृत्व बदल अन् मुंबईला धडा... ना वाद ना चर्चा थेट कंडकाच पाडला

धोनीची दुखापतही मोठं कारण

महेंद्रसिंह धोनीला गेल्या हंगामात गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. याबाबत इरफान पठाणने धोनीच्या दुखापतीवर अपडेट दिली होती. धोनी पूर्णपणे फिट आहे. तो संपूर्ण स्पर्धा आरामात खेळू शकतो. धोनी किती फिट आहे हे तो स्वतःच सांगू शकतो. गेल्या हंगामात तो दुखापतग्रस्त होता. या हंगामात देखील त्याला दुखापत झाली तर फ्रेंचायजीसाठी ही डोकेदुखी ठरले.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.