Nitish Rana SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झाला. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असातना वरूण चक्रवर्तीने चेंडू निर्धाव टाकत सामना खिशात टाकला. विशेष म्हणजे शेवटचे षटक हे फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला नाईलाज म्हणून देण्यात आले नव्हते. नितीश राणाकडे शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा या दोन वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटू वरूण चक्रवर्तीचा देखील पर्याय होता. मात्र नितीश राणाने वेगवान गोलंदाज, तोही शार्दुल ठाकूरला सोडून वरूण चक्रवर्तीवर जुगार खेळला.
नितीश राणाने सामना संपल्यानंतर मुरली कार्तिकशी बोलताना आपण शेवटचे षटक वरूण चक्रवर्तीलाच का दिले याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, 'मधल्या षटकात आम्ही काही षटकात भरपूर धावा दिल्या. त्यावेळी मी शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोराला गोलंदाजी देण्याचा जुगार खेळला. या दोघांनही सेट झालेल्या फलंदाजांना बाद केले. त्यामुळे आम्ही सामन्या पुनरागमन करू शकलो.'
नितीश राणा पुढे म्हणाला की, 'आम्हाला हैदराबादच्या सेट झालेल्या फलंदाजांना बाद करणे गरजेचे होते. कारण जर ते शेवटपर्यंत खेळले असते तर सामना आमच्या हातून निसटला असता. शेवटचे षटक कोणाला द्यायचे याबाबत माझ्या मनात शंका होती. मी फिरकीसोबत जाऊ की वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी देऊ? मी माझ्या फिरकीपटूला संधी दिली. मी कायम सामन्यात कोणता फिरकीपटू चांगली गोलंदाजी करतोय याकडे लक्ष देतो. मी त्याला पाठिंबा देतो. म्हणूनच मी वरूण चक्रवर्तीला गोलंदाजी दिली.'
शेवटचे षटक टाकणारा वरूण चक्रवर्ती याबाबत म्हणतो की, 'शेवटचे षटक टाकताना माझ्या ह्रदयाचे ठोके जवळवास 200 ला टेकले होते. मी शेवटच्या षटकात लांब सीमारेषेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांना लांब सीमारेषेच्या बाजूला फटकेबाजी करण्यास भाग पाडले. चेंडू चांगला वळत होता. मोठी सीमारेषा हीच माझी एकमेव आशा होती.'
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.