IPL 2024, GT vs SRH: कमिन्सचा हैदराबाद संघ का ठरू शकतो गिलच्या गुजरातला वरचढ? ही आहेत 3 कारणे

IPL 2024, GT vs SRH: रविवारी दोन सामने होणार असून पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाईल.
GT vs SRH | IPL 2024
GT vs SRH | IPL 2024Sakal
Updated on

IPL 2024, GT vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL 2024) रविवारी (31 मार्च) डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना दुपारी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात रंगणार आहे. हा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 12 वा सामना असणार आहे.

हा दोन्ही संघांचा तिसरा सामना असून दोन्ही संघांनी आत्तापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असतील.

दरम्यान, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असला, तरी या सामन्यात हैदाराबादचे पारडे का जड राहू शकते, याचा आढावा शकते.

1. विस्फोटक फलंदाज

दोन्ही संघांकडे फलंदाजीमध्ये सखोलता आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याची तसेच मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याची क्षमता दोन्ही संघांकडे आहे. परंतु, आक्रमक फलंदाजी ही हैदराबादची जमेची बाजू आहे.

हैदराबादकडे ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम, हेन्रिक क्लासेन असे विस्फोटक फलंदाज आहेत, जे संघाला मोठ्या धावांपर्यंत पोहचवू शकतात. तसेच अभिषेक शर्मा आणि क्लासेन यांची गुजरातचा प्रमुख फिरकीपटू राशीद खानविरुद्ध चांगली आकडेवारीही आहे.

दरम्यान, असे असले तरी हैदराबादसमोर गुजरातच्या फलंदाजीचेही मोठे आव्हान आहे. त्यांच्याकडे हैदराबादसारखे विस्फोटक फलंदाज नसले, तरी त्यांची फलंदाजीत मोठी सखोलता आहे.

GT vs SRH | IPL 2024
Crime News : महिला खेळाडूचा विनयभंग,प्रशिक्षकास अटक ; म्हापसा पोलिसांकडून दीपक शर्माला अटक

2. अष्टपैलू खेळाडूंची ताकद

हैदराबादकडे अब्दुल सामद, अभिषेक शर्मा, शाहबाज अहमद आणि कर्णधार पॅट कमिन्स हे अष्टपैलू खेळाडूही आहेत. त्यांच्याकडे अखेरच्या षटकात संघासाठी धावा जोडण्याची क्षमता आहे.

गुजरातकडेही राशीद खान आणि आर साई किशोर हे खेळाडू आहेत, जे फलंदाजीत योगदान देऊ शकतात. अष्टपैलू खेळाडूंच्याबाबत या दोन्ही संघांचे पारडे समान आहे.

3. हैदराबादची गोलंदाजी सरस

गोलंदाजीबद्दल विचार करायचा झाल्यास गुजरातची ताकद डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी आहे, परंतु सुरुवातीला त्यांना मोहम्मद शमीची कमी भासताना दिसत आहे. त्यामुळे सुरुवातीला आणि मधल्या षटकात त्यांच्याविरुद्ध मोठ्या धावा होताना दिसत आहेत.

त्यातही राशीद आणि मोहित शर्मा ही गुजरातची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जर हैदराबादची फलंदाजांनी चांगला खेळ केला, तर मात्र गुजरातला मोठे आव्हान मिळू शकते.

GT vs SRH | IPL 2024
IPL 2024: अबब, तब्बल 155.8kph स्पीडचा बॉल! ज्याच्या वेगानं उडवली पंजाबची भंबेरी, तो कोण आहे मयंक यादव?

या तुलनेत हैदाराबादकडे चांगली गोलंदाजी आहे. कर्णधार पॅट कमिन्स ही हैदराबादची सर्वात मोठी ताकद आहे. कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 500 हून अधिक धावा झालेल्या सामन्यातही किफायतशीर गोलंदाजी केली होती. याशिवाय भुवनेश्वर कुमार हा अनुभवी वेगवान गोलंदाजही संघात आहे.

त्याचबरोबर अभिषेक शर्मा, मयंक मार्केंडे, शाहबाज अहमद आणि अब्दुल सामद हे फिरकी गोलंदाजीसाठीही पर्याय आहेत. याशिवाय टी नटराजन किंवा जयदेव उनाडकट आणि उम्रान मलिक हे देखील वेगवान गोलंदाजी करताना महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. एकूणच हैदराबादकडे गोलंदाजीसाठी विविध पर्याय असल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे.

आमने-सामने आकडेवारी

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत ३ सामने झाले आहेत. यातील २ सामने गुजरातने जिंकले आहेत, तर 1 सामना हैदराबादने जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.