World Archery : भारतीय तिरंदाजांची अंतिम फेरीत धडक

जागतिक तिरंदाजी स्पर्धा : सुवर्णपदकाची लढत चीनशी
World Archery
World Archerysakal
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष तिरंदाजांनी तुर्की येथील अंतल्या येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अतानू दास, बी. धीरज व तरुणदीप राय हे सदस्य असलेल्या भारतीय संघाने पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली.

आता येत्या रविवारी होणाऱ्या सुवर्णपदकाच्या लढतीत भारतासमोर चीनच्या तिरंदाजांचे आव्हान असणार आहे. भारतीय तिरंदाजांना जागतिक स्पर्धेमध्ये तब्बल १३ वर्षांनंतर रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची संधी असणार आहे.

या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला चौथे मानांकन देण्यात आले होते. पहिल्या फेरीत भारतीय संघाला पुढे चाल देण्यात आली. त्यानंतर भारतीय संघाने जपानचे कडवे आव्हान ५-४ असे परतवून लावले. शूटऑफमध्ये भारताने २९-२८ असा रोमहर्षक विजय साकारला. भारतीय संघाने चीन तैपईचे आव्हान सहज परतवून लावले.

भारताने त्यांच्यावर ६-२ असा विजय मिळवला. या लढतीत भारताकडे ४-० अशी आघाडी होती. या विजयानंतर भारतीय संघाचा सामना नेदरलँड संघाशी झाला. भारतीय तिरंदाजांनी अचूक बाण सोडत नेदरलँडवर ६-२ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीत पाऊल टाकले. नेदरलँड व स्लोवेनिया यांच्यामध्ये ब्राँझपदकाची लढत होणार आहे.

रिकर्व्ह प्रकारातील भारताची कामगिरी

भारताने २००८ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये रिकर्व्ह प्रकारात पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले. भारताच्या या विजयी संघामध्ये जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी व मंगलसिंह चंपिया या खेळाडूंचा समावेश होता. भारतीय संघाने अंतिम लढतीत मलेशियाला २१८-२१५ असे नमवले होते.

२००८ पासून भारतीय संघाने जागतिक स्पर्धेतील रिकर्व्ह प्रकारात पाच सुवर्णपदके पटकाविली आहेत.

भारतीय संघाने जागतिक स्पर्धेतील रिकर्व्ह प्रकारात अखेरचे सुवर्णपदक २०१० मध्ये शांघायमध्ये जिंकले.

जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी व तरुणदीप राय यांनी भारताला अखेरचे सुवर्णपदक जिंकून दिले होते. भारताने जपानला २२४-२२० असे नमवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()