Wrestlers Protest DC vs CSK : दिल्लीतील जंतर मंतरवर भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचारचे आरोप करत आंदोलनाला बसल्या आहेत. या प्रकरणी जोपर्यंत बृजभूषण यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत त्या आंदोलन सुरूच ठेवणार आहेत.
दरम्यान, आंदोलन करणारे विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे आज दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर धोनीचा आयपीएल सामना पाहण्यासाठी गेले होते. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना स्टेडियममध्ये जाण्यापासून रोखले. विशेष म्हणजे या सर्वांकडे सामन्याची तिकीटे देखील होती.
कुस्तीपटू गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांनी माझे कुस्तीपटूंना समर्थन असे खास टी शर्ट घातले होते. याद्वारे ते आपले आंदोलन जागतिक पातळीवर पोहचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना जोरदार प्रतिकार केला.
यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. त्यात साक्षी मलिक आणि इतर कुस्तीपटूंना पोलीस अरूण जेटली स्टेडियमवर जाण्यापासून रोखत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या.
कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्धचे आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर महिला कुस्तीपटू आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे कुस्तीपटू आता आपले आंदोलन रमलीला मैदानावर हलवण्याच्या तयारीत आहे. रामलीला मैदान मोठं असल्याने तेथे त्यांना अजून समर्थक गोळा करता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.