WTC Final 2023 : भारताचं टेन्शन वाढलं... WTC Final इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाला मिळणार झुकतं माप?

 Kookaburra red Ball
Kookaburra red Ballesakal
Updated on

WTC Final 2023 Kookaburra red Ball : भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये ड्युक बॉलवर खेळणार नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही ऑस्ट्रेलियन कूकाब्युरा बॉलवर खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल ही 7 जून पासून ओव्हलवर खेळवण्यात येणार आहे.

दोन्ही संघांनी कूकाब्युरा चेंडूवर फायनल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रिकी पॉटिंगने आयसीसीने ड्युक ऐवजी कूकाब्युरा बॉलला पसंदी दिल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले.

 Kookaburra red Ball
BCCI World Cup 2023 : अहमदाबादमध्ये बैठक; आयपीएल फायनलपूर्वीच वर्ल्डकप सामन्यांची ठिकाणे होणार फायनल

रिकी पॉटिंग म्हणाला होता की, 'हा सामना ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा आणि भारताची वरची फळी असा असले. या विचारानेच तोंडाला पाणी सुटले आहे. सर्वसाधारणपणे द्वंद्व हे भारतीय फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज असे असते. ही शक्यता ओव्हलवर नाकारता येणार नाही. ओव्हलची खेळपट्टी ही सहसा फलंदाजांसाठी चांगली असते तसेच ती काही प्रमाणात फिरकीला देखील साथ देते.'

 Kookaburra red Ball
Suryakumar Yadav Virat Kohli : विराटच्या शतकानंतर सूर्याने केली परतफेड; म्हणाला...

गेल्या वर्षी इंग्लंडने न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ड्युक बॉलबाबत तक्रार केली होती. हा चेंडू लवकर आपला आकार गमावतो, सॉफ्ट होतो आणि स्विंग हरपतो. यावेळी ड्युक बॉल तयार करणाऱ्या कंपनीचे मालक दिलीप जजोदिया यांनी चेंडूच्या टॅनिंग प्रोसेसवेळी यात काही तांत्रिक अडचण आली असले असे उत्तर दिले होते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.