Shreyas Iyer : अय्यरचं नशीबचं बेकार! आधी कर्णधारपद गेलं आता WTC Final खेळण्याची संधीही गमावली

WTC Final 2023 Indian Cricket Team Shreyas Iyer
WTC Final 2023 Indian Cricket Team Shreyas Iyeresakal
Updated on

WTC Final 2023 Indian Cricket Team Shreyas Iyer : बीसीसीआयने नुकतेच WTC Final 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांची आश्चर्यकारक एन्ट्री झाली आहे. मात्र या संघातून अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांचे बदली खेळाडू दिले आहेत. अजिंक्य रहाणे हा श्रेयस अय्यरची रिप्लेसमेंट म्हणून संघात आला आहे. रहाणेने स्थानिक स्पर्धा आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याचे संघात पुनरागमन झाले.

WTC Final 2023 Indian Cricket Team Shreyas Iyer
IPL 2023 Slow Over Rate : चुकीला माफी नाही! BCCI रोज लाखो रूपये वसूल करतंय, आयपीएलमधील कर्णधार वैतागले

मात्र श्रेयस अय्यर कमनशिबी ठरला. श्रेयस अय्यरला दुखापतींमुळे फटका बसण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्याला यापूर्वी आयपीएलमध्ये दुखापतीमुळे मोठा फटका बसला होता. 2021 च्या आयपीएल हंगामात तो खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला. यानंतर दिल्लीचे कर्णधारपद हे ऋषभ पंतकडे आले. त्याने चांगली कामगिरी केल्यानंतर पुढच्या हंगामात पंतलाच दिल्लीचा कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले.

आता कसोटी संघात कष्टाने मिळवलेले स्थान याच दुखापतीमुळे गेले आहे. पाठदुखीमुळे अय्यर आधीच आयपीएलचा हंगाम खेळत नाहीये. आता तो WTC Final साठी निवडलेल्या भारतीय कसोटी संघातही त्याला स्थान मिळाले नाही.

WTC Final 2023 Indian Cricket Team Shreyas Iyer
GT vs MI Playing 11 : पंजाबकडून धुलाई झालेली मुंबई आपली प्लेईंग 11 बदलणार?

श्रेयस अय्यर सोबतच जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे WTC Final खेळू शकणार नाही. त्याच्या जागी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरची निवड झाली आहे. या दोघांमध्ये मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीसोबत वेगवान गोलंदाज म्हणून पहिली पसंती मिळवण्यासाठी स्पर्धा असेल.

अपघातानंतर गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागलेल्या ऋषभ पंतच्या जागी देखील केएस भरत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात खेळणार आहे. सूर्यकुमारच्या जागी केएल राहुल संघात आला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.