Yashasvi Jaiswal :6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6 आयपीएलचा 1000 वा सामना यशस्वीने केला खास

Yashasvi Jaiswal IPL 1000th Match MI vs RR
Yashasvi Jaiswal IPL 1000th Match MI vs RResakal
Updated on

Yashasvi Jaiswal IPL 1000th Match MI vs RR : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर विजयासाठी 213 धावांचा मोठे आव्हान ठेवले. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल मुंबईच्या गोलंदाजांना एकटा भिडला. त्याने 62 चेंडूत तडाखेबाज 124 धावा ठोकल्या. यशस्वीचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. यात त्याने 16 चौकार आणि 8 षटकार लगावले. राजस्थानकडून जैसवालनंतर जॉस बटलरने सर्वाधिक 18 धावा केल्या. मुंबईकडून अर्शद खानने 3 विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या सामन्याप्रमाणे 1000 वा सामना देखील शतकी खेळीने सजला. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रँडन मॅक्युलमने शतकी तडाखा दिला होता. त्यानंतर आता 1000 व्या सामन्यात यशस्वी यादवने शतक ठोकले. योगायोग म्हणजे या दोघांचेही आयपीएलमधील हे पहिले शतक ठरले.

Yashasvi Jaiswal IPL 1000th Match MI vs RR
Arjun Tendulkar MI vs RR : बर्थडे बॉय रोहितचे रिटर्न गिफ्ट; हजाराव्या सामन्यात अर्जुन बाहेर अर्शद आत

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याऱ्या राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 65 धावा चोपून दमदार सुरूवात केली. यात सलामीवीर यशस्वी जैसवालच्या 23 चेंडूत केलेल्या नाबाद 41 धावांचा मोठा वाटा होता. दरम्यान, सावध सुरूवात करणाऱ्या जॉस बटलरने पॉवर प्ले नंतर गिअर बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र पियुष चावलाने त्याला 18 धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला.

राजस्थानने दमदार सुरूवात केल्यानंतर बटलर बाद झाला. त्यानंतर आपल्या इनिंगची सुरूवातच षटकाराने करणारा संजू सॅमसन देखील 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याला अर्शद खानने बाद केले. यानंतर पियुष चावलाने देवदत्त पडिक्कलला 2 धावांवर बाद करत राजस्थानची अवस्था 3 बाद 103 अशी केली.

एका बाजूने राजस्थानचे रथी महारथी स्वस्तात माघारी जात असताना सलामीवीर यशस्वी जैसवाल मुंबईच्या गोलंदाजांना एकटा भिडला. जेसन होल्डर 11, हेटमायर 8 तर ध्रुव जुरेल 2 धावा करून बाद झाल्यानंतर यशस्वीने 53 चेंडूत शतक ठोकत राजस्थानला 200 च्या जवळ पोहचवले.

Yashasvi Jaiswal IPL 1000th Match MI vs RR
CSK vs PBKS Sikandar Raza : जो जीता वही सिकंदर! रझाच्या त्या 3 धावा धोनीच्या दोन्ही षटकारांवर पडल्या भारी

यशस्वीने 19 व्या षटकात दोन षटकार मारत संघाला 196 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर 20 व्या षटकात अर्शदच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत संघाला 200 च्या पार पोहचवले. मात्र तो चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. यशस्वीने 62 चेंडूत 124 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 8 षटकार हाणले. अखेर राजस्थानने 20 षटकात 7 बाद 212 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.