IPL 2024 : 'मी तर त्या खेळाडूला उपकर्णधार बनवलं असतं...' रोहित-हार्दिक कर्णधारपदाच्या वादावर युवीचे धडाकेबाज विधान

Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians : आयपीएल 2024 चा सतरावा हंगामा मुंबई इंडियन्ससाठी खास असणार आहे. कारण हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करणार आहे, आणि यावेळी तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians
Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indianssakal
Updated on

Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians : आयपीएल 2024 चा सतरावा हंगामा मुंबई इंडियन्ससाठी खास असणार आहे. कारण हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करणार आहे, आणि यावेळी तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी हंगामात तो रोहित शर्माच्या जागी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडली. यात युवराज सिंगही मागे राहिला नाही.

Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians
स्टार खेळाडूच्या पोस्टमुळे उडाली खळबळ, IPL 2024 मधून का घेतली माघार स्पष्टच सांगितलं...

आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्स 24 मार्चपासून गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हार्दिक मुंबईचे नेतृत्व करणार आहे तर शुभमन गिल गुजरातचे नेतृत्व करणार आहे.

मुंबईसाठी पाचवेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा रोहित शर्मा यावेळी फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर युवीने म्हटले आहे की, हार्दिकच्या पुनरागमनानंतर रोहितला आणखी एका हंगामासाठी कर्णधारपदाची परवानगी द्यायला हवी होती.

Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians
IPL 2024 : KKR साठी वाजवली धोक्याची घंटा; कर्णधार Shreyas Iyer सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर? मोठे कारण आले समोर

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना युवराज सिंग म्हणाला की, "रोहित शर्माने कर्णधार म्हणून 5 आयपीएल खिताब जिंकले आहेत, त्याला कर्णधारपदावरून काढून टाकणे हा एक मोठा निर्णय होता. पण जर तुम्ही संघात कोणत्याही खेळाडूला आणले, जसे की हार्दिक आला तरीही... रोहित शर्माला आणखी एका हंगामासाठी कर्णधारपदाची संधी दिली पाहिजे... मी हार्दिकला संघाचा उपकर्णधार बनवले असते आणि संपूर्ण फ्रँचायझी कशी काम करत आहे ते पाहिले असते.

Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians
IPL 2024 : पंजाबच्या दोन लढती धरमशालामध्ये रंगणार

तो पुढे म्हणाला की, "पण मी फ्रँचायझीच्या दृष्टिकोनातून बघितले तर ते भविष्याचा विचार करत आहेत. पण जर रोहित भारताचे कर्णधार असेल आणि चांगले खेळत असेल तर हा एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे मला वाटते की प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. फ्रँचायझी त्याच्या भविष्याचा विचार करून योग्य मत घेऊन जाईल. त्यामुळे मला वाटते की ही त्याची विचारसरणी होती. आशा आहे की तो अधिक चांगले करेल.

Yuvraj Singh On Changes In Captaincy Of mumbai indians
Ranji Trophy : विदर्भचा लढा कौतुकास्पद मुंबईच्या तुषार देशपांडेचे मत

यादरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक असलेला सूर्यकुमार यादव आगामी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (27 मार्च) होणार आहे. या दोन सामन्यांपूर्वी एनसीएचे वैद्यकीय पथक सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र देईल की नाही, याबाबत शंका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.