SRH vs LSG : तू कोणत्या ग्रहावर बॅटिंग करतोयस? युवीचा हेडला थेट सवाल, अभिषेक शर्माबाबत केलं मोठं वक्तव्य

Yuvraj Singh on Abhishek Sharma and Travis Head : आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली.
yuvraj singh on abhishek sharma travis head srh vs lsg ipl 2024News Marathi
yuvraj singh on abhishek sharma travis head srh vs lsg ipl 2024News Marathisakal
Updated on

SRH vs LSG IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादच्या सलामीच्या जोडीने लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यांनी 9.4 षटकांत 165 धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या विजयानंतर टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने त्याचा शिष्य अभिषेक शर्माचे कौतुक केले तर ट्रॅव्हिस हेडला एक प्रश्न विचारला.

yuvraj singh on abhishek sharma travis head srh vs lsg ipl 2024News Marathi
SRH vs LSG : त्यांची बॅटिंग आधी असती तर... शर्मा आणि हेडच्या तांडव नृत्यावर क्रिकेटच्या देवाने दिला मोठा संकेत

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकात 165 धावा केल्या. त्यानंतर चाहत्यांना असे वाटले की लखनौचे गोलंदाज इतक्या लवकर हार मानणार नाहीत. पण अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यावरून असे दिसते की 300 धावांचे लक्ष्यही कमी आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान हेडने 8 चौकार आणि 8 षटकार मारले.

yuvraj singh on abhishek sharma travis head srh vs lsg ipl 2024News Marathi
IPL 2024 : हैद्राबादच्या वादळाने मुंबईच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात... प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी ठरली पहिली टीम

याशिवाय अभिषेक शर्माने 75 धावांची नाबाद खेळी केली. अभिषेकने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार मारले होते. अभिषेक आणि हेडची फलंदाजी पाहून युवराज सिंग खूप खुश दिसत होता. युवराजने ट्विट करून लिहिले की, "मस्त खेळलास... अभिषेक! आता तुझी वेळ आली आहे. ट्रॅव्हिस हेड मित्रा.. तू नक्की कोणत्या ग्रहावर बॅटिंग करतोय? अशक्य आहे हे!"

yuvraj singh on abhishek sharma travis head srh vs lsg ipl 2024News Marathi
VIDEO : लाजिरवाणा पराभवानंतर KL राहुलला मालकाने फटकारले? सर्वांसमोर घेतली शाळा

सनरायझर्स हैदराबादने हा सामना 10 गडी राखून जिंकला. हैदराबादचा या हंगामातील 12 सामन्यांमधील हा सातवा विजय आहे. आता हैदराबादचे गुणतालिकेत 14 गुण झाले आहेत. यासह हैदराबादने प्लेऑफसाठी आपला मजबूत दावा पक्का केला आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजीही अप्रतिम होती. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे लखनौचे फलंदाज हतबल दिसत होते. या सामन्यात गोलंदाजी करताना भुवीने 4 षटकात केवळ 12 धावा देत 2 बळी घेतले. या हंगामात आतापर्यंत भुवनेश्वरच्या नावावर 11 विकेट्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.