Yuzvendra Chahal KKR vs RR : युझी चहलनं चेन्नईच्या ब्राव्होला टाकलं मागं, आयपीएलमध्ये इतिहास रचला

Yuzvendra Chahal KKR vs RR
Yuzvendra Chahal KKR vs RR ESAKAL
Updated on

Yuzvendra Chahal KKR vs RR : राजस्थान रॉयर्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने आज कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात लेग स्पिनर युझवेंद्र चहलने एक मोठा पराक्रम केला आहे. युझवेंद्र चहलने केकेआरचा कर्णधार नितीश राणाला 22 धावांवर बाद केले. त्याने व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी 48 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत केकेआरचा डाव सावरला होता. हीच जोडी फोडून चहलने आपले नाव आयपीएलच्या इतिहासात सवर्णाक्षरांनी कोरले.

युझवेंद्र चहलने नितीश राणाला 22 धावांवर बाद केले. शिमरॉन हेटमायरने अफलातून झेल पकडत युझवेंद्र चहलला आपली ऐतिहासिक 184 वी विकेट घेण्यास मदत केली. या विकेटबरोबरच युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा स्टार माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकले. ब्राव्होने 183 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा पियुष चावला 174 विकेट्स घेऊन तिसऱ्या तर अमित मिश्रा 172 विकेट्स घेत चौथ्या स्थानावर आहेत. चहलचा संघसहकारी रविचंद्रन अश्विन सध्या 171 विकेट्स घेत या यादीत पाचव्या स्थानावर आहे. हे तीनही गोलंदाज अजून आयपीएल खेळत असल्याने चहलला आपले अव्वल स्थान अबाधित ठेवण्यासाठी चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ट्रेंट बोल्टने पॉवर प्लेमध्ये केकेआरला दोन धक्के दिले. यामुळे त्यांची सुरूवात संथ झाली. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी डाव सारवत संघाला 77 धावांपर्यत पोहचवले होते. मात्र नितीश राणा 22 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला आंद्रे रसेलही 10 धावांची भर घालून परतला. दरम्यान, व्यंकटेश अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 42 चेंडूत 57 धावा करणाऱ्या अय्यरचा चहलनेच काटा काढला. अय्यर बाद झाला त्यावेळी केकेआरच्या 16 षटकात 5 बाद 127 धावा झाल्या होत्या. अय्यर पाठोपाठ चहलने शार्दुल ठाकूरला 1 धावेवर बाद करत केकेआरला सहावा धक्का दिला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()