Yuzvendra Chahal: चहलची थेट इलॉन मस्कला विनंती, हर्षल पटेलवर लावा कॉपीराईट; कारण घ्या जाणून

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघात झालेल्या सामन्यात असं काय झालं की चहलने हर्षल पटेलवर कॉपीराईटचा आरोप केला, जाणून घ्या.
Yuzvendra Chahal - Harshal Patel | IPL 2024
Yuzvendra Chahal - Harshal Patel | IPL 2024Sakal
Updated on

Yuzvendra Chahal Post: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) 49 वा बुधवारी (1 मे) सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या दोन संघांच्या सामन्यादरम्यान मात्र फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले.

झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि समीर रिझवी फलंदाजी करत होते. यावेळी 16 व्या षटकात कागिसो रबाडाला गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर रिझवीने मोठा फटका खेळला. पण थर्ड मॅनला हर्षल पटेलने पळत येत शानदार झेल घेतला.

Yuzvendra Chahal - Harshal Patel | IPL 2024
Ruturaj Gaikwad: चेपॉकवर ऋतु'राज'! विराटला मागे टाकत ऑरेंज कॅप तर पटकावलीच, पण धोनीचा विक्रमही मोडला

यावेळी झेल घेतल्यानंतर विकेटसाठी अपील करताना त्याने एका हाताचा आधार घेत कुशीवर एक पाय पुढे आणि एक पाय मागे अशा स्थितीत तो होता. दरम्यान, त्याची ही स्थिती युजवेंद्र चहलच्या बसण्याच्या आयकॉनिक स्टाईलशी मिळती जुळली होती. याचीच दखल चहलने घेतली आणि त्याने गमतीशीर ट्वीट केले.

त्याने थेट एक्सचे (ट्विटर) मालक इलॉन मस्क यांच्याकडे गमतीने हर्षल पटेलवर कॉपीराईट लावा अशी विनंती केली.

त्याने ट्विट केले की 'प्रिय इलॉन मस्क पाजी, हर्षल भाईवर कॉपीराईट लावायचा आहे.' दरम्यान, चहलच्या या ट्वीटवर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.

चहलची झाली भारतीय संघात निवड

चहलला नुकतीच एक चांगली बातमी मिळाली असून त्याला आगामी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन होऊ शकते.

Yuzvendra Chahal - Harshal Patel | IPL 2024
CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

चेन्नईचा पराभव

बुधवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला 20 षटकात 7 बाद 162 धावा करता आल्या होत्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 48 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावांची खेळी केली. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर पंजाबने 163 धावांचे लक्ष्य 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि विजय मिळवला. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली, तर रिली रुसोने 43 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लिसन आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.