IRE vs IND Playing 11: दुसऱ्या टी-20मध्ये टीम इंडिया बदलणार, हा खेळाडू प्लेइंग-11 मधून बाहेर?

IRE vs IND Playing 11
IRE vs IND Playing 11
Updated on

IRE vs IND Playing 11 : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह च्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आज आयर्लंडविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. पावसाच्या व्यत्ययादरम्यान डकवर्थ लुईस पद्धतीनुसार पहिला सामना भारताने दोन धावांनी जिंकला होता. दुसरा सामनाही डब्लिनमधील द व्हिलेज येथे होणार आहे.

भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेता येईल. यामध्ये कोणतीही चूक होऊ नये हे लक्षात घेऊन टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याच्या मनस्थितीत आहे.

IRE vs IND Playing 11
UAE vs NZ 2nd T20: न्यूझीलंडला हरवून UAE ने रचला इतिहास! किवी संघाच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आता भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या जागीवर बदल होऊ शकतात हा प्रश्न आहे. त्यामुळे हा बदल गोलंदाजीमध्ये दिसून येऊ शकतो, जिथे पहिल्या टी-20 मध्ये सर्वात महागडा ठरलेला अर्शदीप सिंग बाहेर जाऊ शकतो.

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये भारताने 6 गोलंदाज आजमावले, ज्यामध्ये चार जणांनी आपले 4 षटके टाकली, आणि हे 4 गोलंदाज होते ज्यांनी विकेट देखील घेतल्या. अर्शदीप सिंग देखील त्यापैकी एक होता, ज्याने 1 विकेट घेतला. तथापि, या 1 विकेटसाठी त्याला 8.75 च्या इकॉनॉमीसह धावा खर्च कराव्या लागल्या, ज्यामुळे तो उर्वरित गोलंदाजांच्या तुलनेत सर्वात महागडा ठरला.

IRE vs IND Playing 11
Team India: वर्ल्डकप अन् आशिया कपमध्ये 'हा' खेळाडू बनणार टीम इंडियाचा उपकर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट?

आता टीम इंडिया दुसऱ्या टी-20 मध्ये अर्शदीपच्या जागी अवेश खान किंवा मुकेश कुमारला संधी देण्याची शक्यता आहे. संघात या एका बदलाशिवाय अन्य बदल होण्याची शक्यता नाही. फलंदाजीत भारतीय संघ त्याच खेळाडूंसोबत मैदानात उतरेल जे पहिल्या टी-20 मध्ये खेळताना दिसले होते. बुमराह आणि प्रसिद्ध बॉलिंगची कमान सांभाळताना दिसणार आहेत. दोघेही प्रदीर्घ कालावधीनंतर परतले आहेत, अशा स्थितीत त्यांना अजून अधिकाधिक सामन्यांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.