IRE vs IND: 'मी 10 वर्षांपासून...', पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकल्यानंतर रिंकू झाला भावुक

IRE vs IND t20 Rinku Singh Player of the Match
IRE vs IND t20 Rinku Singh Player of the Match
Updated on

IRE vs IND Rinku Singh's Statement : टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार कामगिरी करत आयर्लंडचा 33 धावांनी पराभव केला. भारताचा उगवता स्टार रिंकू सिंग या विजयाचा हिरो ठरला. त्याने फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावली आणि 38 धावा करत संघाला सन्मानजनक लक्ष्यापर्यंत नेले. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर रिंकूने आपल्या यशाचे रहस्यही उघड केले.

IRE vs IND t20 Rinku Singh Player of the Match
IRE vs IND: 'ही तर मोठी डोकेदुखी...', मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार बुमराह नाराज

भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिंकूने 21 चेंडूंत 38 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याची सरासरी 180.95 इतकी होती. रिंकूच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रिंकू सुरुवातीला हळू हळू खेळत होता. त्यानंतर तो आक्रमक झाला आणि शेवटच्या 6 चेंडूत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला. रिंकूने पदार्पणाच्याच इनिंगमध्येच सर्वांची मने जिंकली. या खेळीसाठी रिंकूला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब मिळाला.

IRE vs IND t20 Rinku Singh Player of the Match
Akhil Sheoran : अखिलचा पॅरिस ऑलिंपिकसाठी कोटा! जागतिक नेमबाजीत ब्राँझपदकाची कमाई; सांघिक गटात दोन सुवर्ण

सामन्यानंतर रिंकू म्हणाला, मला माझ्या फलंदाजीवर विश्वास होता आणि मी आयपीएलचा अनुभव वापरण्याचा प्रयत्न करत होतो. मी शेवटपर्यंत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. मी 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि आता मला माझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे.

IRE vs IND t20 Rinku Singh Player of the Match
India Vs Ireland : 0, 0, 0, W, 0, B4... शेवटच्या षटकात बुमराहचा जुना स्वॅग, कॅप्टन बुमराहने 'मालिका विजया'चा नराळ फोडला

आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 185 धावा केल्या. गायकवाडने संघासाठी 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावाच करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.