IRE vs IND: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, बुमराहला अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

Ireland Tour of India Jasprit Bumrah
Ireland Tour of India Jasprit Bumrahsakal
Updated on

Ireland Vs India 1st T20 Weather Report : भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुखापतीमुळे जवळपास वर्षभर मैदानाबाहेर राहिल्यानंतर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानात परतण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेत तो टीम इंडियाचा कर्णधारही आहे. आयर्लंडचा संघ घरच्या मैदानावर खेळत असून त्याला कमी लेखता येणार नाही.

Ireland Tour of India Jasprit Bumrah
IRE vs IND 1st T20: आजपासून रंगणार आयर्लंड विरुद्धचा टी-20 थरार! स्टार अन् सोनीवर नाही तर येथे पाहा 'फ्री' सामना

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. त्यावेळी पावसाची 70 टक्के शक्यता आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. सायंकाळी 5 नंतर रात्रीपर्यंत पावसाची शक्यता 95 टक्के आहे. असे झाल्यास चाहत्यांची निराशा होऊ शकते. यासोबतच तेथे थंडीही आहे. दिवसभरात कमाल तापमान 18 अंशांवर जाईल.(Latest Marathi News)

द व्हिलेज स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो. या मैदानावर भारतीय संघाने तीन वेळा 200हून अधिक धावा केल्या आहेत. येथे सर्वात मोठी धावसंख्या 252 धावांची आहे. यामुळे चाहत्यांना हाय स्कोअरिंग मॅच बघायला मिळू शकते.

भारतासोबतच आयर्लंड संघात अनेक स्फोटक फलंदाज आहेत. या मैदानावर आतापर्यंत 16 सामने झाले आहेत. ज्यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 9 वेळा विजय मिळवला आहे. पण भारताने प्रथम फलंदाजी करताना तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र, गेल्या वर्षी येथे भारताच्या 225 धावांना प्रत्युत्तर देताना आयर्लंडने 221 धावा केल्या होत्या.

भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.