Irfan Pathan : भाई मी खूश आहे... माझा तुला पाठिंबा फक्त.. इरफानच्या गाझा कमेंटवर दानिश कनेरिया काय म्हणाला?

Irfan Pathan
Irfan Pathanesakal
Updated on

Irfan Pathan : हमासने इस्त्राइलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवल्यानंतर प्रत्युत्तरात इस्राइलने गाझा पट्टीत तुफान बॉम्बवर्षाव करण्यास सुरूवात केली. तसेच गाझा पट्टीत आपले सैन्य देखील घुसवले. इस्त्राइलने या प्रतिहल्ल्यावेळी शाळा, रूग्णालय आणि सामन्य नागरिकांना देखील लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे.

Irfan Pathan
NZ vs PAK : सेमी फायनलच्या आशा कायम! फखर जमान अन् पावसानं पाकिस्तानला तारलं

याच संदर्भात भारताचा माजी वेगवान गोलंदाज इराफान पठाणने ट्विट केले होते. या ट्विटची बरीच चर्चा झाली. आता यावर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इराफान पाठणने एक्स हँडलवर लिहिले की, 'गाझा पट्टीमध्ये प्रत्येक दिवशी शुन्य ते 10 वर्षापर्यंतची निष्पाप मुलं मरत आहेत. मात्र संपूर्ण जग मौन बाळगून आहे. एक खेळाडू म्हणून मी फक्त बोलू शकतो. मात्र खूप झालं आता तरी जागतिक नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि अतार्किक किलिंग संपवण्याची गरज आहे.'

इरफान पाठणच्या या ट्विटवर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने खोचक ट्विट केले. तो म्हणाला, 'इरफान भाई तुम्ही लहान मुलांच्या वेदना जाणता हे ऐकून मला आनंद झाला. माझा तुला पाठिंबाच आहे. मात्र कृपा करून पाकिस्तानातील हिंदूंबद्दल देखील बोला. पाकिस्तानात परिस्थिती काही वेगळी नाहीये'

Irfan Pathan
Wasim Akram : जगासमोर अपमान करून घेण्याचा... अक्रमने केली चेंडू तपासण्याचं वक्तव्य करणाऱ्याची खरडपट्टी

दरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट अँटोनी ब्लिंकेनन यांना हमासविरूद्धचे युद्ध थांबवणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, इस्राइल तात्पूर्ती शस्त्रसंधी करण्यास नकार देत आहे. इस्राइल गाझा पट्टीला बळ देणाऱ्या कोणत्याही गोष्टी येऊ देणार नाही. आमचा गाझा पट्टीत पैसे पाठवण्यास विरोध राहील.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.