Irfan Pathan :''भारतीय संघाची मानसिता बदलण्याची गरज, कर्णधार नाही!''

भारतीय संघावर चौफेर टीका होत असून; कर्णधार त्वरित बदलायची मागणी होत आहे मात्र...
irfan pathan
irfan pathansakal
Updated on

Irfan Pathan on Team India T20 Captaincy : ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघावर चौफेर टीका होत असून; कर्णधार त्वरित बदलायची मागणी होत आहे; मात्र भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण याने संघाचा कर्णधार बदलण्यापेक्षा मानसिकतेत बदल होणे अपेक्षित आहे असे म्हटले आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

भारतीय संघाबद्दल बोलताना इरफान म्हणाला, की ‘‘एका पराभवाने संघाचा कर्णधारच बदलावा असे मला आजिबात वाटत नाही. तर भारतीय संघ ज्या प्रकारे यंदाचा ट्वेंटी-२० विश्वकरंडक खेळला ते बघता त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची जास्त गरज आहे. इरफानने संघाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्यासाठी तीन मुद्दे सांगितले आहेत. १) सलामी करणाऱ्या फलंदाजांनी मोकळेपणाने खेळ करायला हवा. २) समोरच्या संघाचे फलंदाज सहज बाद करू शकेल असा एक तरी फिरकीपटू संघात असावा आणि वेगवान गोलंदाजांनी दबावाखाली सुमार मारा करणे सोडले पाहिजे.

irfan pathan
NZ vs IND : टी-20 मालिकेआधीच विल्यमसनने उचलली ट्रॉफी; पांड्या आवरत बसला टेबल, Video व्हायरल

रोहितवर दबाच चुकीचा

‘रोहित शर्माला विश्वकरंडक स्पर्धेमध्ये साजेशी खेळी करता आली नसली आणि त्याच्यावर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा दबाव क्रिकेटप्रेमींकडून टाकला जात असला, तरी मला ते योग्य वाटत नाही; कारण त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी येऊन फक्त एक वर्षच झाले आहे.

irfan pathan
IND vs NZ : टीम इंडियासाठी ऋषभ पंत करणार ओपनिंग ? शर्यतीत हे पण दिग्गज खेळाडू!

हार्दिकसाठी तंदुरुस्ती महत्वाची

हार्दिक पंड्याने जरी या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये गुजरातच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला असला; तरी त्याला सारखे दुखापतीमधून जावे लागते हे विसरून चालणार नाही. जर त्याला कर्णधार केले आणि महत्वाच्या सामन्याअगोदर त्याला दुखापत झाली, तर त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी कोण स्वीकारणार हा मोठा प्रश्न संघासमोर उभा राहू शकतो. त्यामुळे रोहितलाच कर्णधार पदावर कायम ठेवण्यात यावे’ असेही इरफान पुढे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.