Video : रोड सेफ्टी मालिकेत धमाका, 'Irfan Pathan अजूनही भारतीय संघाकडून खेळू शकतो'

India Legends vs Australia Legends Irfan Pathan
India Legends vs Australia Legends Irfan Pathanesakal
Updated on

India Legends vs Australia Legends Irfan Pathan : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लेजंड्सने ऑस्ट्रेलिया लेजंड्सचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताकडून इरफान पठाणने दमदार फटकेबाजी करत इंडिया लेजंड्ससाठी मॅच फिनिशरची भुमिका बजावली. त्याने 39 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने चार षटकार आणि दोन चौकार मारले. इरफान पठाणची ही खेळी पाहून चाहत्यांना तो अजूनही भारतीय संघाकडून खेळू शकतो असे ट्विट केले.

India Legends vs Australia Legends Irfan Pathan
Ravindra Jadeja : मांजरेकर - जडेजाचा पुन्हा एकदा ट्विटरवर 'टिवटिवाट' मात्र...

ऑस्ट्रेलियालाने ठेवलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इरफान पठाणने 17 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या डिर्क नॅन्सला षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर त्याने 19 व्या षटकात तीन षटकार मारत सामना जवळ आणला. दरम्यान पठाणने विजयाची औपचारिकता शेवटच्या षटकात ब्रेट लीला चौकार मारत पूर्ण केली.

इंडिया लेजंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने ट्विटरवर संघातील खेळाडूंचे अंतिम फेरीत दाखल झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्याने ट्विट केले की, 'इंडियाचा चांगला प्रयत्न, गोलंदाजांनी काल आव्हानात्म परिस्थितीत दमदार कामगिरी केली. आज फलंदाजीत नमन ओझा आणि इरफान पठाण यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला.'

India Legends vs Australia Legends Irfan Pathan
ICC New Cricket Rule : उद्यापासून क्रिकेटचे नियम बदलणार; T20 वर्ल्डकपमध्येही होणार लागू

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या होत्या. यात बेन डंकने 46 तर एलेक्स डूलन याने 35 धावांची खेळी केली. तर शेन वॉट्सन आणि कॅमेरून व्हाईट यांनी प्रत्येकी 30 धावांची खेळी केली. याच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताकडून नमन ओझाने नाबाद 90 धावांची खेळी केली. तर इरफान पठाणने नाबाद 39 धावांची विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.