भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 चे फिव्हर वाढत आहे. तर दुसरीकडे इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध देखील चांगलेच भडकले आहे. काही देश इस्त्राइल तर काही देश पॅलेस्टाईनचा बाजू घेत आहेत. देशांसोबतच क्रीडा क्षेत्रात देखील इस्त्राइल - हमास युद्धाचे पडसाद उमटले असून पाकिस्तानी खेळाडूंनी पॅलेस्टाईनला आपले समर्थन दिले आहे.
दरम्यान, भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने इस्राइल आणि हमास युद्धावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. त्याने आपली शतकी खेळी गाझा पट्टीतील लोकांना समर्पित केली होती. यानंतर पाकिस्तान संघातील अनेक खेळाडूंनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला.
भारताचा माजी गोलंदाज आणि समालोचक इरफान पठाणने एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली. तो लिहितो, 'युद्धात जखमी झालेल्या सर्व निर्दोष लोकांच्या मुलासाठी माझ्या ह्रदयात वेदना आहेत. लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी.' इरफान पठाणने आपल्या या पोस्टद्वारे कोणत्याही देशाची बाजू घेतली नाही.
मात्र कमेंट बॉक्समध्ये अनेक लोकांनी इरफानने पॅलेस्टाईन बाजू घेतल्याचे म्हटले तर काहींनी त्याने इस्त्राइलची बाजू घेतल्याचे म्हटले.
हमासने इस्त्राइलवर मिसाईल हल्ला केला होता. त्यात जवळपास 1500 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्त्राइलने केलेल्या बॉम्बवर्षावात जवळपास 3000 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा अधिकृत नाही. इस्त्राइलने दावा केला की हमासने फक्त हल्ला केला नाही तर अनेक इस्त्राइल नागरिकांना ओलीस देखील ठेवलं आहे. यात महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.
दुसरीकडे हमासने इस्त्राइलवर गाझा पट्टीतील अल अहली रूग्णालयावर बॉम्ब वर्षाव केल्याचा आरोप केला. यात जवळपास 500 निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. इस्त्राइलने हा आरोप फेटाळला आहे.
दुसरीकडे इरफान पाठाणने वर्ल्डकप सामन्यादरम्यान समालोचन करताना भारतीय संघ 2011 सारखी पुन्हा एकदा विश्वविजेती ठरू शकते. पाठण 2007 च्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भार राहिला आहे. त्याने कसोटीत पाकिस्तानविरूद्ध हॅट्ट्रिक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.