Irfan Pathan : तर ही फॅशनच होईल... संसदेतील भाजप खासदाराच्या वक्तव्यावर पठाणचे ते ट्विट व्हायरल

Irfan Pathan
Irfan Pathanesakal
Updated on

Irfan Pathan : गुरूवारी लोकसभेत भाजपचे खासदार रमेश बिधूडीने एका पाठोपाठ एक आक्षेपार्ह वक्तव्य केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार गदारोळ झाला. दक्षिण दिल्ली मतदार संघाचे खासदार बिधूडी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल आतंकवादी आणि मुल्ली असे शब्द वापरले. याचबरोबर त्यांना बाबर बघून घेण्याची देखील धमकी दिली.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर संरक्षण मंक्षी राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त करत माफी देखील मागितली. मात्र वाद काही थांबलेला नाही. या वादात आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने उडी घेतली आहे.

Irfan Pathan
Mohammed Shami : पाटा खेळपट्टीवर पंजा! मोहालीने शमीला तर शमीने ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाम फोडला

भारताच्या माजी क्रिकेटपटूने या मुद्द्यावर आपले मत ट्विटद्वारे व्यक्त केले. इरफान पठाणने आपल्या ट्विटमध्ये कोणाचे नाव न घेता एका वाक्यात आपले म्हणणे मांडले. तो म्हणाला, 'जर तुम्ही चिथावणीखोर वक्तव्य बंद केली नाही तर ही एक प्रकारची फॅशन होऊन जाते.' याचबरोबर त्याने याला #Parliament असा हॅशटॅग देखील लावला. यावरून त्याचा रोख हा दानिश अली यांच्याबद्दल रमेश बिधूडी यांनी केलेल्या वक्तव्याकडे असल्याचे संकेत मिळतात.

Irfan Pathan
CWC 2023 Prize money : यंदाचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघावर लक्ष्मी होणार प्रसन्न; दहा - वीस नाही तर मिळणार इतके कोटी रूपये

बिधूडी यांना मिळाली नोटिस

रमेश बिधूडी यांनी केलेले वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर भाजप देखील अॅक्शन मोडमध्ये आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशानंतर दक्षिण दिल्लीच्या खासदारांना नोटिस देखील पाठवण्यात आली आहे. गुरूवारी ही घटना घडली त्यावेळी संसदेत चंद्रयान - 3 च्या यशाबद्दल लोकसभेत चर्चा सुरू होती. यावेळी रमेश बिधूडी दानिश अली यांच्यावर जाम भडकले.

दानिश अली यांनी रमेश यांच्यावर कारवाई झाली नाही तर ते खासदारकी सोडणार असे सांगितले. दानिश म्हणाले की, 'हा माझा नाही तर पूर्ण देशाचा अपमान आहे. पहिल्यांदाच संसदेत कोणाला अशा प्रकारे बोलले गेले आहे. दानिश अली हे उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदार संघातून बहुजन समाजवादी पक्षाच्या तिकीटावर खासदार झाले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.