३३ सेकंदाचा MS Dhoni चा तो व्हिडीओ अन् पुन्हा रिटायरमेंटच्या चर्चेला उधाण

धोनीने गुपचुप रिटायरमेंट घेतल्याची चर्चा
MS Dhoni
MS Dhoni
Updated on

क्रिकेट वर्तुळात महेंद्र सिंह धोनीने गुपचुप रिटायरमेंट घेतल्याची चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे सीएसकेने शेअर केलेला ३३ सेकंदाचा व्हिडीओ. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Is Dhoni retiring from IPL? CSK’s cryptic post sparks speculations)

गेल्या वर्षीपासून धोनी निवृत्त होणार असल्याची चर्चेने जोर धरला आहे. २०२३ ची आयपीएल ही शेवटची असल्याचे सांगण्यात येत होते. पण धोनीने निवृत्तीवर अनेकदा स्पष्टीकरण देत निवृत्तीला वेळ असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, सीएसकेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केल्याने रिटायरमेंटच्या चर्चेला उधाण आलं आहे.

व्हिडीओत नेमकं आहे तरी काय?

सीएसकेने पोस्ट केलेला व्हिडीओ भावनिक आहे. या व्हिडीओमध्ये तो पायऱ्या चढताना दिसत आहे. 'ओह कॅप्टन, मेरे कॅप्टन' अशी कॅप्शन सीएसकेने दिली आहे.

या व्हिडिओमध्ये एक भावनिक संगीत वाजत आहे. हे सर्व पाहून चाहतेदेखील भावूक झाले आहेत. एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप या मुद्द्यावर धोनी किंवा CSK संघाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

MS Dhoni
MS Dhoni: कॅप्टन कूलला १०वी, १२वीत किती टक्के मार्क होते?

घाई कशाला... नंतर बघू!

गतविजेत्या गुजरातचा पराभव करून अंतिम फेरी गाठल्यानंतर पुढच्या वर्षी चेन्नईत खेळणार का असे विचारलं असता, ‘इतक्यात घाई कशाला, विचार करायला अजून आठ-नऊ महिने आहेत’ असे उत्तर दिले.

MS Dhoni
MS Dhoni चं लग्न? पत्रिका व्हायरल, फोटो आणि जर्सी नंबर अन् बरच काही...

एमएस धोनी... तो केवळ चॅम्पियन क्रिकेटर नाही तर चाहत्यांची तो एक मोठी भावना आहे. त्याची लोकप्रियता इतकी आहे की तो देशात कुठेही गेले तरी त्याला तितकेच प्रेम मिळते आणि कोणताही भेदभाव केला जात नाही. मोदीनंतर धोनीच या काळात लीडरशिपचा आदर्श ठरत आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या रंगात रंगलेला महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा सोनेरी रंगात अवतरला. गुजरात टायटन्सविरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला, पण त्याच्या संघाला जे हवे होते त्याने पूर्ण केले ते म्हणजे जेतेपद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com