Ishan Kishan : BCCI चा काखेत कळसा गावाला वळसा! शोधत होतो पंतमध्ये, दम दाखवला किशनने

Ishan Kishan Fastest ODI Double Century
Ishan Kishan Fastest ODI Double Century esakal
Updated on

Ishan Kishan Fastest ODI Double Century : बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. मात्र बांगलादेशकडून मालिका गमावल्यानंतर ही कामगिरी झाल्याची सल मनात असणारच आहे. भारतीय संघ देर आया मगर दुरुस्त आया. भारताने अनेक दिवसांनी आज इशान किशनला सलामीला ट्राय केले. इशान किशनने ही मिळालेली संधी दवडली नाही. त्याने 131 चेंडूत 210 धावांची तुफानी खेळी करत भारताला 35 व्या षटकात 300 पार पोहचवले. इशान किशनला आजच्या सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनं करून दाखवलं. तसेच बीसीसीआय आणि निवडसमितीच्या डोळ्यात देखील अंजन घातलं.

Ishan Kishan Fastest ODI Double Century
Ishan Kishan : वा रे इशान! पहिलीच संधी अन् द्विशतकी खेळी, रचला इतिहास

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात ऋषभ पंतची कशा प्रकारे जागा निर्माण करता येईल यासाठी संघ व्यवस्थापन धडपडत होते. ऋषभ पंत मधल्या फळीत फार उपयुक्त ठरत नव्हता. म्हणून त्याला सलामीला पाठवण्याचा प्रयोग देखील करून झाला. वनडे मालिकेत देखील त्यालाच प्राधान्य देण्यात आले. मात्र पंतला कसोटीसारखा प्रभाव मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पाडता आला नाही. त्याला संघ व्यवस्थापन सातत्याने संधी देत होतं. मात्र संजू सॅमसन आणि इशान किशन या विकेटकिपर फलंदाजांकडे संघ व्यवस्थापन दुर्लक्ष करत होते. संजू सॅमसन आणि इशान किशन यांना तुरळक संधी मिळाली. मात्र संघ व्यवस्थापन पंत इतके मेहरबान त्यांच्यावर नव्हते.

अखेर बांगलादेश दौऱ्यावरून ऋषभ पंत मायदेशात परतला. त्यावेळी इशान किशनची मने लड्डू फुटे अशी अवस्था नक्की झाली असणार. मात्र केएल राहुलने विकेटकिपिंगचे ग्लोज आपल्या हातात घालत इशान किशनला बेंचवर बसवण्यास भाग पाडले. मात्र म्हणतात ना 'किसी चीज को अगर चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है.'

Ishan Kishan Fastest ODI Double Century
Virat Kohli : 1 धावावर जीवदान! किंग कोहलीने बांगलादेशात रचला इतिहास

दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली अन् तो तिसऱ्या वनडेला मुकला. मालिका आधीच गमावल्यामुळे प्रयोग करायला हरकत नव्हती. त्यात पंतही जागा बळकवण्यासाठी जागेवर नव्हता. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि डावखुऱ्या इशान किशनला त्याच्या आवडीच्या सलामीच्या जागेवर भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली. ही संधी त्याने आपल्या छातीला लावून धरत याचं सोनंच नाही तर सोनं, चांदी, प्लॅटनिम सगळं केलं. त्याने आपले पहिलेच वनडे शतक द्विशतकात रूपांतरित केले. तेही सर्वात वेगवान.

Ishan Kishan Fastest ODI Double Century
Ishan Kishan : जिंकलास भावा! संधीचं सोनं करावं इशान किशनसारख, ठोकले पहिले शतक

भारतीय संघावर आक्रमक प्रवृत्ती न दाखवता जुन्या पद्धतीने खेळण्याचा आरोप होत होता. तसेच ऋषभ पंतला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त काळ पोसलं जात आहे असेही बोलले जात होते. या सर्व पार्श्वभुमीवर इशान किशनने सलामीला येत ठोकलेले हे द्विशतक संघ व्यवस्थापनासाठी एकप्रकारे इशाराच आहे. इशांतच्या द्विशतकात पंतचा मोह आता साडो, शिखर धवनची बॅटिंग स्टाईलवनडेमध्ये संयुक्तिक नाही असे काही सुप्त संदेश आहेत.

इशानचे द्विशतक मॉडर्न वनडे क्रिकेट खेळताना कशा प्रकारचा अॅप्रोच दाखवायचा हे इशानच्या इनिंगने दाखवून दिले. तसेच इशानचे हे शतक आता संघात युवा खेळाडूंना संधी देण्याची योग्य वेळ आल्याचेही दाखवून देते. कारण इशान एकटात रांगेत उभा नाहीये. टीम इंडियाच्या मुख्य संघाच्या दरवाजाबाहेर रांगेत उभा राहिलेल्यांची देखील मोठी रांग आहे. आता तरी बीसीसीआय, संघ व्यवस्थापनाचे डोळे उघडतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.