Ishan Kishan : संपर्कच केला नाही... इशान किशनबाबत झारखंड क्रिकेट असोसिएशनने केला मोठा दावा

Ishan Kishan
Ishan Kishanesakal
Updated on

Ishan Kishan Controversy : भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकिपर इशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई झाली असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबत स्पष्टीकरण देत इशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई केली नसून त्यानेच क्रिकेटमधून ब्रेक मागितला होता असं सांगितलं. मात्र आता पीटीआयने झारखंड क्रिकेट असोसिएशनने वेगळीच माहिती दिली असल्याचे वृत्त दिलं आहे.

Ishan Kishan
Babar Azam : मी तर सहन केलं नसतं आफ्रिदी भाई... बाबरचा 'तो' Video ठरतोय चर्चेचा विषय

भारत आणि अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडला इशान किशन आणि श्रेयस अय्यरला टी 20 संघातून वगळण्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई केली नसल्याचा खुलासा केला.

राहुल द्रविड म्हणाला की, 'इशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नाही. इशान किशन निवडीसाठी उपलब्ध नव्हता. दक्षिण आफ्रिकेत इशान किशनने ब्रेकची मागणी केली होती. त्यावेळी आम्ही त्याच्या मागणीला पाठिंबा दिला. त्याने अजून आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलेलं नाही. मला खात्री आहे की ज्यावेळी तो निवडसाठी उपलब्ध असेल त्यावेळी तो स्थानिक क्रिकेट खेळेल आणि स्वतःला निवडीसाठी उपलब्ध असल्याचं सांगेल.'

राहुल द्रविडने इशान किशनला स्थानिक क्रिकेट खेळूनच संघात परतावे लागेल याचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर पीटीआयने झारखंड क्रिकेट असोसिएशनशी संपर्क केला. सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे इशान किशनने रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी संपर्क केला होता का अशी विचारणा केली.

यावेळी सचिव चक्रवर्ती यांनी सांगितले की, 'नाही इशानने आमच्या संपर्क केलेला नाही किंवा तो रणजी सामने खेळण्यासाठी उपलब्ध आहे असेही काही सांगितलेले नाही. ज्यावेळी आम्हाला तो उपलब्ध आहे असे सांगेल त्यावेळी त्याला थेट प्लेईंग 11 मध्ये जागा करून दिली जाईल.'

Ishan Kishan
David Warner Chopper Entry : वॉर्नर निवृत्त झाला तरी थाट काही कमी नाही झाला! चॉपर एन्ट्रीचा Video व्हायरल

श्रेयस अय्यर बाबत देखील राहुल द्रविडने स्पष्टीकरण दिले होतं. तो म्हणाला की, अय्यरच्या बाबतीत देखील त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. तो फक्त टी 20 संघात बसू शकला नाही. कारण संघात खूप फलंदाज आहेत. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील टी 20 मालिका खेळला नव्हता.'

द्रविड पुढे म्हणाला की, 'अय्यर खूप दुर्दैवी ठरला. तो चांगला खेळाडू आहे मात्र टी 20 संघात खूप फलंदाज आहेत. त्यामुळे प्रत्येकाला संघात स्थान देणं शक्य नाही. त्याच्या बाबतीत कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. निवडसमितीसोबत माझं जेवढं बोलणं झालं आहे त्यावरून तरी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नाही.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.