Ishan Kishan or KS Bharat In IND vs WI Test : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी डॉमिनिका येथे खेळली जाईल. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी यष्टिरक्षकाची निवड करणे खूप कठीण काम असणार आहे. केएस भरत आणि इशान किशन यांचा यष्टिरक्षक म्हणून कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
ऋषभ पंतनंतर टीम इंडियाने बॅकअप विकेटकीपर केएस भरतवर विश्वास दाखवला होता. भरतने यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीद्वारे कसोटी पदार्पण केले. भरतला आतापर्यंत फलंदाज म्हणून विशेष काही करता आलेले नाही. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यांत फलंदाजी करताना त्याने 101 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 44 धावांची होती.
याशिवाय नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केएस भरतलाही संधी देण्यात आली होती. तिथेही तो बॅटने फ्लॉप दिसला. त्याने दोन्ही डावात केवळ 28 धावा केल्या. भरतची ही कामगिरी पाहून त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कुठे तरी बाहेरचा रस्ता दाखवल्या जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
केएस भरतच्या पदार्पणापासूनच ईशान किशन भारतीय कसोटी संघासोबत बॅकअप यष्टिरक्षक म्हणून जात आहे. अशा परिस्थितीत ईशान किशन वेस्ट इंडिज दौऱ्याद्वारे कसोटी पदार्पण करू शकतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ईशान किशनचे आकडे खूप चांगले आहेत. त्याचवेळी ईशान फलंदाजीत आक्रमक वृत्ती स्वीकारतो. अशा परिस्थितीत तो संघासाठी उपयुक्तही ठरू शकतात.
ईशानने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 48 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2985 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 शतके झळकली आहेत. अशा स्थितीत त्याचे कसोटी पदार्पण निश्चित असल्याचे मानले जात आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.