Ishan Kishan Test Debut : इशान किशनची पदार्पणाच्या कसोटीतच 'धोनीगिरी', यशस्वी सोडाच विराटलाही दिला आदेश

Ishan Kishan Test Debut Stump Mic
Ishan Kishan Test Debut Stump Micesakal
Updated on

Ishan Kishan Test Debut Stump Mic : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि विकेटकिपर इशान किशन यांना कसोटीची कॅप मिळाली असून पदार्पणाच्या सामन्यात या दोघांनीही पहिल्याच दिवशी प्रभावित केले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजला भारताने 150 धावात गुंडाळले. यावेळी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत विकेटकिपिंगची जबाबदारी इशान किशनने चोख पार पाडली. काही वेळा तो चेंडू पकडताना गोंधळत होता.

मात्र त्याच्याकडे आलेले सर्व झेल त्याने चांगल्या पद्धतीने पकडले. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याची माईकवाणी देखील चांगलीच प्रसिद्ध झाली. (Ishan Kishan Stump Mic)

Ishan Kishan Test Debut Stump Mic
'WTC Final वेळीच मी तयार होतो पण..', विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेत अश्विनने टीम मॅनेजमेंटला दाखवला आरसा

ऋषभ पंत प्रमाणेच झारखंडच्या इशान किशनला देखील विकेटच्या मागून कुरापती करण्यात चांगली मजा येते. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या इशान किशनला यावेळी देखील आपल्या या कुरापतींना आवर घालणे जमले नाही. त्याने विंडीजच्या फलंदाजांना टोमणे मारले. त्याचबरोबर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना देखील त्याने सोडले नाही. (Ishan Kishan News)

सध्या सोशल मीडियावर इशान किशनची ही माईकवाणी चांगलीच व्हायरल होत आहे. यात इशान किशन यशस्वी जैसवाल आणि अनुभवी विराट कोहलीला देखील फिल्डिंगसाठी कुठं उभं रहायचं ये सांगत होता. यानंतर इशान किशन हा अश्विनच्या एका चेंडूवर चांगलाच आश्चर्यचकीत झाला होता.

अश्विनचा चेंडू फारच वळला होता. त्यावर इशान किशन म्हणाला की, 'कोणती जागा शोधून काढली भाऊ.' याचबरोबर इशान किशनने वेस्ट इंडीजचे फलंदाज एका चेंडूवर एकेरी धाव घेऊ शकले नाहीत त्यावर देखील टोमणा मारला होता.

Ishan Kishan Test Debut Stump Mic
Wi vs Ind Test : ईशान किशनने पंतचे दरवाजे केलं बंद? भन्नाट झेल पकडल्याने उडाली खळबळ

असा होता पहिला दिवस

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या दोनसत्रातच विंडीजचा पहिला डाव 150 धावात गुंडाळला. अश्विनने 5 तर रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. (West Indies Vs India 1st Test News)

वेस्ट इंडीजकडून अलिक अथानजेने सर्वाधिक 47 धावा केल्या. भारताने आपला दुसरा डाव तिसऱ्या सत्रात सुरू केला होता. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी 23 षटके फलंदाजी करत बिनबाद 80 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यशस्वी जैसवला 40 तर रोहित शर्मा 30 धावा करून नाबाद होते.

(Sports News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.