Team India : ईशान किशनने अचानक टीम का सोडली? हे धक्कादायक कारण आले समोर...

Ishan Kishan Team India
Ishan Kishan Team India
Updated on

Ishan Kishan Team India : जेव्हा ईशान किशनने दुलीप ट्रॉफी 2023 मधून बाहेर पडलो, तेव्हा असे वृत्त आले की त्याला कदाचित कसोटी क्रिकेट खेळण्यात फारसा रस नाही. तो फक्त एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. मात्र तसे नाही आणि इशान किशनने वर्कलोड मॅनेजसाठी दुलीप ट्रॉफीच्या या मोसमात सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Ishan Kishan Team India
Ambati Rayudu : धोनीचा पठ्ठ्या CM जगनमोहन रेड्डीच्या लागला गळाला; खासदार होणार की आमदार?

ईशान किशनने या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले. ज्यामध्ये असे म्हटले जात होते की कदाचित त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि यामुळे तो दुलीप ट्रॉफीपासून लांब झाला आहे. न्यूज18 शी बोलताना किशनने सांगितले की वर्कलोड मॅनेज करण्यासाठी तो या वेळी या स्पर्धेत भाग घेणार नाही. कारण त्याने 2023 मध्ये आतापर्यंत प्रत्येक मालिकेत भाग घेतला आहे.

आयपीएल 2023 मध्ये देखील खेळला आहे. त्याच वेळी थोड्या विश्रांतीनंतर तो पुढील आठवड्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाईल जिथे तो वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकेची तयारी करेल.

Ishan Kishan Team India
Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया कपमधून मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामना रद्द

टीम इंडियाचे पुढील मिशन वेस्ट इंडिज दौरा आहे. जिथे या संघाला दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही क्रिकेट मालिका 12 जुलैपासून सुरू होणार आहे, मात्र त्यासाठी टीम इंडियाची घोषणा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

ईशान किशन नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे जिथे तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाचा भाग होता, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याचवेळी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Ishan Kishan Team India
BAN vs AFG : भारत-पाकला जमलं नाही, ते बांग्लादेशने करून दाखवलं, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

ईशान किशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याला अद्याप भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. त्याच वेळी त्याने भारतासाठी 14 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने शतकाच्या मदतीने 510 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 42.50 आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 210 धावा आहे. याशिवाय त्याने भारतासाठी 27 टी-20 सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 653 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.