Ranji Trophy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांनी टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेतला आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
बीसीसीआयने 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील फेरीपूर्वी खेळाडूंना आपापल्या रणजी संघात सामील होण्यास सांगितले आहे. इशान किशनसारख्या खेळाडूने रणजी सोडून आयपीएलची तयारी सुरू केली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रेयसलाही कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
वैयक्तिक कारणांचा हवाला देत इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकाही खेळला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, इशानला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. असे असूनही, तो रणजी ट्रॉफी खेळला नाही. प्रशिक्षकाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून इशान बडोद्याला गेला आणि हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासोबत सराव करताना दिसला.
रणजी खेळण्याचा बीसीसीआयचा सल्ला केवळ इशान आणि श्रेयसलाच लागू होणार नाही, तर कृणाल पांड्या आणि दीपक चहरसारख्या खेळाडूंनाही लागू होईल, जे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाच्या योजनांमध्ये नाहीत. श्रेयसच्या खराब फॉर्ममुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांतून संघातून वगळण्यात आले होते. आता त्यालाही हा निर्णय मान्य करावा लागणार आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने क्रिकबझला सांगितले की, खेळाडू त्यांच्या आवडीनुसार आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करू शकत नाहीत. खेळणे म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएल नाही. खेळाडूंना देशांतर्गत हंगाम आणि क्रिकेटचा भाग देखील असावा लागेल आणि त्यांना त्यांच्या राज्यातील संघांना प्राधान्य द्यावे लागेल.
हार्दिक पांड्याला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून खेळण्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. त्याचबरोबर वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर असलेल्या विराट कोहलीवर हा निर्णय लागू होणार नाही. त्याचवेळी इशान आयपीएलच्या प्रतीक्षेत आपला वेळ वाया घालवत आहे. रिपोर्ट्सनुसार, तो कुठे आहे आणि काय करतोय हेही त्याने बोर्डाला सांगितलेलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.