India vs Afghanistan Series : जूनमध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्याआधी टीम इंडिया आपली शेवटची टी-20 मालिका अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल 14 महिन्यांनंतर परतले आहेत. बीसीसीआय या खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपचा भाग बनवू शकते. टी-20 मालिकेसाठी खेळाडूची निवड झाल्यानंतर जवळपास ही बाब स्पष्ट झाली.
पण अफगाणिस्तानविरुद्ध इशान किशनची निवड न झाल्याने 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याचे खेळणे धोक्यात असल्याचे निश्चितपणे दिसून येते आहे. कारण एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये गिलमुळे त्याला केवळ 3 सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
आता अफगाणिस्तानविरुद्ध संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वर्ल्ड कपमध्ये बॅकअप यष्टिरक्षक म्हणून इशानची नव्हे तर संजूची निवड करू शकतात. राजस्थान रॉयल्समुळे दोघांमध्ये जुने नाते आहे, जे त्यांच्या निवडीसाठी जवळचे मानले जाऊ शकते.
वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर टीम इंडिया मॅनेजमेंट टी-20 फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन म्हणून इशान किशनचा विचार करत असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत त्याची निवड न होणे आश्चर्यकारक आहे.
वास्तविक, गेल्या वर्षभरातील परिस्थिती हेच कारणीभूत आहे. तुम्हाला आठवत असेल तर, ईशान किशनने गेल्या महिन्यात अचानक कसोटी मालिकेतून आपले नाव काढून घेतले होते. बीसीसीआयने या निर्णयामागे वैयक्तिक कारणे दिली होती. पण एका अहवालात असे म्हटले आहे की, मानसिक थकव्यामुळे ईशानने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
अशा परिस्थितीत टीम इंडियाचे दरवाजे ईशानसाठी बंद आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ईशान आता टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळताना दिसणार नाही का? याचे उत्तर अजून देता येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.