ISSF World Championships : भारताने जागतिक नेमबाजी स्पर्धेत पटकावले तिसरे सुवर्ण

ISSF World Championships
ISSF World Championships esakal
Updated on

ISSF World Championships : भारताने बाकू येथे सुरू असलेल्या ISSF जागतिक चॅम्पियशिप स्पर्धेत 25 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. भारताच्या सांगवान, इशा सिंग, मनू भाकर यांनी देशासाठी सुवर्ण जिंकले. त्यांनी एकूण 1744 गुण मिळवले.

ISSF World Championships
Prithvi Shaw Arjun Tendulkar : मित्रा तू फक्त.... नाराज झालेल्या पृथ्वी शॉसाठी अर्जुन तेंडुलकर आला धावून

भारतीय संघाने अंतिम फेरीत तैवानचा पराभव केला. तैवानच्या तिईन चिआ चेन, तू यी त्झू आणि वू चिआ यांगने 1743 गुण मिळवत रौप्य पदक पटकावले. चीनच्या संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

भारताचे हे ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील तिसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी इशा सिंह आणि शिवा नरवाल यांनी 10 मीट एयर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. तर मेहुली घोष, तिलोत्तमा सेन आणि रमिता यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात 1895.9 गुण घेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.

ISSF World Championships
FIFA Women's World Cup 2023 : स्पेनने इंग्लंडचा इतिहास रचला; फिफा महिला वर्ल्डकपला मिळाला नवा विजेता

भारताचे हे स्पर्धेतील एकूण पाचवे पदक आहे. शनिवारी मेहुली घोषने ऑलिम्पिकसाठीची पात्रता फेरी गाठली. तिने महिला 10 मीटर एअर राफयल प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. तर पुरूष 10 मिटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारतीय संघाने कांस्य पदक पटकावले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.