Asia Cup 2023 : 'मला जो आवडत नाही, त्याला मी संघात...', संघ निवडीबाबत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य

Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

Asia Cup 2023 Rohit Sharma : आशिया कप 2023 चा थरार उद्यापासून म्हणजे 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंका मध्ये रंगणार आहे. 2 सप्टेंबरला भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या 17 सदस्यीय मुख्य संघाची घोषणा करण्यात आली. तर संजू सॅमसनला राखीव ठेवण्यात आले होते.

याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना स्थान न मिळाल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेत या दोघांना स्थान न मिळाल्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. आता पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपआधी एका मुलाखतीत यावर मोठे विधान केले आहे.

Rohit Sharma
Asia Cup 2023 : कधी होणार आशिया कपचा उद्घाटन सोहळा, कोठे पाहायचा लाईव्ह भारत - पाक सामन्याचा थरार?

आशिया कप 2023 च्या आधी भारतीय कर्णधार रोहित म्हणाला की, येत्या दोन महिन्यांत संघासबोत काही आठवणी तयार करण्याचा विचार करीत आहे. आगामी आशिया कपमध्ये भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी तिलक वर्मासारख्या युवा खेळाडूचाही संघाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल संघात परतले आहेत. भारतीय संघाच्या निवडीबाबत आता कर्णधार रोहित शर्माने खुले वक्तव्य केले आहे.

Rohit Sharma
Asia Cup 2023 IND vs PAK : उत्सुकता शिगेला मात्र भारत-पाकिस्तान सामना रद्द? मोठे कारण आले समोर

रोहित शर्माने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संघाची निवड करताना काही खेळाडूंना काही कारणांमुळे वगळावे लागले आहे. मी आणि राहुल द्रविड त्या खेळाडूंना संघात स्थान का मिळू शकले नाही हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला जो आवडत नाही, त्याला मी संघातून बाहेर कर नाही. कर्णधारपद तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी किंवा नापसंतीवर आधारित नसेल. जर कोणी संघात नसेल तर त्याची कारणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.