Video: अँडरसनने स्मिथला टाकलेला इनस्विंग होतोय चांगलाच Viral

James Anderson
James Andersonesakal
Updated on

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 185 धावांवर गुंडाळला. मात्र इंग्लंडनेही (England Cricket Team) याचा बदला घेत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 171 धावात गारद केला. इंग्लंड कडून जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांनी प्रभावी मारा केला. दरम्यान, जेम्स अँडरसनने (James Anderson) कांगारुंचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथचा उडवलेल्या दांडीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

James Anderson
SA vs IND : राहुलच्या शतकाशिवाय ही गोष्टही राहिली चर्चेत

अ‍ॅशेस मालिकेत 2 - 0 ने पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडला मालिका परभाव टाळायचा असेल तर बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने खेळ उंचावणे अपेक्षित होते. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या डावात साफ निराशा केली. त्यांचा संपूर्ण डाव 185 धावात गुंडाळला गेला. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियालाही (Australia Cricket Team) पाठोपाठ धक्के देत सामन्यातील चुरस कायम ठेवली.

James Anderson
AUS vs ENG : इंग्लंडचा दुसरा डावही गडगडला

इंग्लंडकडून अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. त्याने पहिल्यांदा दमदार फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड वॉर्नरला बाद केले. त्यानंतर गेल्या सामन्यात 93 धावांची दमदार खेळी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) जेस्म अँडरसनने उत्कृष्ट इनस्विंग चेंडूवर दांडी गुल केली. स्मिथ 16 धावांवर बाद झाला. अँडरसनचा हा इनस्विंग खेळताना स्मिथ पार गडबडला. त्याने हा चेंडू अखेच्या क्षणी बॅटने आडवण्याच्या प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चेंडू स्मिथच्या बॅटची कडा घेऊन स्टंपवर आदळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()