Wrestling Federation Of India Election : उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ठेवणार WFI च्या निवडणुकीवर लक्ष

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh esakal
Updated on

Wrestling Federation Of India Election : बृजभूषण शरण सिंह यांच्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक आता जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायधीशांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकासाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Bajrang Punia Kisan Mahapanchayat : शेतकऱ्यांच कुरूक्षेत्र! बजरंग पुनियाही पोहचला किसान महापंचायतीत

भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले. या कुस्तीपटूंनी बृजभूषण यांना अटक करून त्वरित पदावरून हटवण्याची मागणी केली होती. मात्र एफआयआर दाखल होऊनही बृजभूषण यांना अटक झाली नाही. दिल्ली पोलीस याबाबत अजून तपास करत आहेत.

दुसरीकडे क्रीडा मंत्रालयाने एक समिती नेमून बृजभूषण यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या दैनंदिन कामकाजापासून दूर ठेवले.

Brij Bhushan Sharan Singh
Gautam Gambhir Virat Kohli : म्हणून मी नवीनच्या मागं उभा राहिलो... विराटशी पंगा घेणारा गंभीर बरंच काही बोलून गेला

बृजभूषण हे यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीयेत. ब्रिज भूषण यांनी अध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. त्यांनी १२ वर्षे कार्यकाळ पूर्ण केला आहे. आचारसंहितेनुसार आता त्यांना मोठ्या पदावर कार्यरत होता येणार नाही. आता त्यांचे वय ६६ आहे. त्यांना चार वर्षे कुलींग ऑफ पीरियडचा सामना करावा लागेल. त्यानंतर त्यांचे वय ७० होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.