Jannik Sinner: २३ वर्षीय सिनर ठरला US Open चा नवा विजेता! अव्वल क्रमांकाला साजेसा खेळ करत उंचावली ट्रॉफी

Tennis Update: २०२४ हंगामात यानिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन नंतर अमेरिकन ओपन विजेतेपद देखील पटकावले आहे.
jannik sinner
jannik sinneresakal
Updated on

Jannik Sinner: अमेरिकन ओपन २०२४ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरने विजेतेपद पटकावत इतिहास रचला. US Open चे विजेतेपद जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टेनिसपटू यानिक सिनरने रविवारी (८ सप्टेंबर) आर्थर ॲश स्टेडियमवर अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा ६-३, ६-४, ७-५ असा पराभव करत अमेरिकन ओपनचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.

याआधी २३ वर्षीय सिनरने जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती आणि आता त्याने अमेरिकन ओपनचे पुरूष एकेरीमध्ये विजेतेपद पटकावले आहे.

"मला टेनिस खेळायला खूप आवडते. माझ्यासाठी हे जेतेपद खूप महत्त्वाचे आहे, कारण माझ्या कारकिर्दीचा मागील काही काळ खूप खडतर होता. माझ्या जवळच्या व्यक्तींनी आणि टीमने मला खूप सहकार्य केले. मी या आव्हानात्मक सामन्यांसाठी खूप सराव करतो आणि तयार असतो," असे सिनर म्हणाला.

"मला हे जेतेपद माझ्या मावशीला समर्पित करायचे आहे, मावशी माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे, कारण जेव्हा माझे आई-वडील दिवसभर कामाला जायचे, त्यावेळी मावशीने माझी काळजी घेतली व माझ्या या प्रवासात मला खुप सहकार्य केले."

"सध्या तिची तब्येत बरी नाही. मला माहित नाही की माझ्या आयुष्यात ती अजून किती दिवस आहे. पण हे खूप छान झाले की मी तिच्यासोबत एक सकारात्मक क्षण शेअर करू शकतो."

पुढे सिनर म्हणाला, "तुम्हाला माहिती आहे, आम्हाला स्पर्धांनिमीत्त खूप प्रवास करावा लागतो, त्यामुळे जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणे कठीण होते, परंतु जर माझ्याकडे जास्त वेळ असेल, तर निश्चितपणे ज्या लोकांनी माझी काळजी आहे, त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकेन."

२०२३ आणि २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या २६ वर्षीय आर्यना साबालेंकाने काल महिला एकेरीमध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावले.

jannik sinner
Bajrang Punia Death Threat:"...अन्यथा तुझे आणि कुटुंबाचे वाईट होईल," ऑलिम्पिक विजेत्याला जीवे मारण्याची धमकी

सिनरची कारर्किद

यानिक सिनर एक इटालियन व्यावसायिक टेनिसपटू आहे. तो सध्या असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP)च्या क्रमवारीनुसार पुरुष एकेरीमध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे.

सिनरने आपल्या कारर्किदत आत्तापर्यंत टेनिस एकेरी स्पर्धांमध्ये १६ विजेतेपदे जिंकली आहेत , ज्यात २०२४ ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२४ अमेरिकन ओपन अशा दोन प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. तो तीन मास्टर्स १००० विजेता देखील आहे आणि त्याने इटलीला २०२३ डेव्हिस चषक मिळवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.