Jasprit Bumrah : 4, W, 0, 0, W, 0... बूम बूम बुमराह परतला! रोहितचं मोठं टेन्शन झालं दूर

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah ESAKAL
Updated on

Jasprit Bumrah : भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह जवळपास एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय संघात परतला. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेत त्याने आपले पुनरागमन हे दमदार केले. बुमराहने आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात जवळपास 140 KMPH पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आपला फिटनेस सिद्ध केला.

फिट बुमराह पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माचा जीव नक्कीच भांड्यात पडला असेल. जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात आयर्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करत त्यांची 2 बाद 4 धावा अशी अवस्था केली.

Jasprit Bumrah
IRE vs IND 1st T20 : पाऊसही वाचवू शकला नाही आयर्लंडचा पराभव, भारताचा अवघ्या 2 धावांनी विजय

भारताने पहिल्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी टी 20 पदार्पण केले. युवा संघाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय

बुमराहने पहिल्याच षटकात दोन धक्के देत आयर्लंडविरूद्धचा सामना हा फार काळ चालणार नाही याचे संकेत दिले. दुखापतीनंतर बुमराह कसा पदार्पण करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषकरून रोहित शर्मा आणि भारतीय निवडसमिती त्याच्या कामगिरीकडे बारीक लक्ष ठेवून आहे.

बुमराहने पहिल्याच षटकात सलामीवीर अँड्र्यू बालबिर्नेचा 4 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर लॉर्केन टकरला शुन्यावर बाद करत आयर्लंडची अवस्था 2 बाद 4 धावा अशी केली.

Jasprit Bumrah
Asia Cup 2023 : रोहित शर्मामुळे आशिया कपसाठी भारताची संघ निवड अणखी लांबली?

बुमराहनंतर दुसरा दुखापतीनंतर पुनरागमन करणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने देखील दमदार गोलंदाजी केली. त्याने हॅरी टॅक्टर आणि जॉर्ज डॉक्रेल यांना बाद करत आपला पहिला स्पेल यशस्वी केला.

भारताकडून रवी बिश्नोईने देखील चांगला मारा करत 1 विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 10 षटकात आयर्लंडची अवस्था 5 बाद 57 धावा अशी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.